शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 05:53 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या विविध प्रचारसभांमधून विकासाचा अजेंडा मांडत आहेत.

मुंबई : मुंबई आणि एमएमआर क्षेत्र आणि कोकणात सात लाख कोटी रुपयांहून अधिकचे पायाभूत सुविधा प्रकल्प आणले यावर फोकस करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या विविध प्रचारसभांमधून विकासाचा अजेंडा मांडत आहेत.

आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात अनेक विकास प्रकल्पांची सुरुवात मुंबई, कोकणात कशी झाली, त्यांची अंमलबजावणी कशी गतिशील होती आणि गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारच्या काळात आधीच्या आणि अन्य योजनांना कसा वेग आला यावर फडणवीस यांनी प्रचारात लक्ष केंद्रीत केले आहे.   

१.४८ लाख कोटी रुपयांचे ३३७ किमीचेमेट्रो रेल्वे प्रकल्प हाती घेण्यात आले.मुंबईच्या पाच एंट्री पॉइन्टवर टोलमाफी दिली, ३ लाख १३ हजार कोटी रुपये खर्चाचे पायाभूत सुविधा प्रकल्प आणले.  १७८४० कोटी खर्चून अटलसेतू पूर्ण, १३९८३ कोटी रुपये खर्चाचा कोस्टल रोड पूर्णत्वाकडे, बांद्रा-वर्सोवा सी-लिंक ११३३२ कोटी, वर्सोवा-विरार सी-लिंक :५५४७८ कोटी, विरार-अलिबाग मल्टिमॉडल कॉरिडॉर ६०२६८ कोटी, शिवडी-वरळी एलिव्हेटेड कॉरिडॉर : १२९४ कोटी, ठाणे कोस्टल रोड २५३५ कोटी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान टनेल १६६०० कोटी, मुंबई ऊर्जा मार्ग २९१७ कोटी, नैना प्रकल्पाला गती या मुद्यांवर फडणवीस प्रचारात भर देत आहेत.लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ १९४४६ कोटी, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर ३७८० कोटी, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल १ लाख कोटी, जेएनपीटीचा विस्तार ८० हजार कोटी, वाढवण बंदर ७६२२० कोटी, जागतिक दर्जाचे रेवस बंदर, रेवस ते सिंधुदुर्ग सागरी महामार्ग मंजूर या पायाभूत सुविधांचा आवर्जून उल्लेख ते करतात.

मुंबईतील नायगाव, वरळी, ना.म.जोशी मार्ग बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा १७ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प, गिरणी कामगारांना घरे दिली, स्वयंपुनर्विकासाची योजना आणली, १६ हजार कोटी रुपयांच्या सिवेज ट्रिटमेंट प्लँटची कामे प्रगतीपथावर, २४९० कोटींच्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांना गती (दहीसर, पोईसर, ओशिवारा, मिठी नदी प्रकल्प), धारावी पुनर्विकासाचा २३ हजार कोटींच्या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला, महालक्ष्मी रेसकोर्सवर सेंट्रल पार्क येणार, महापे; नवी मुंबईत ५० हजार कोटींचा जेम्स अँड ज्वेलरी प्रक्लप येणार, वसई, विरार, मीरा भाईंदरमधील १४ लाख नागरिकांसाठी १४०० कोटी रुपये खर्चाची सूर्या पाणीपुरवठा योजना, एमएमआर क्षेत्रात ३५ लाख नवीन रोजगार देणार, पनवेलमध्ये कौशल्य विद्यापीठ, कळंबोली येथे सेंटर ऑफ एक्सलन्स,पालघर, वसई, अलिबाग, पेण, खालापुरातील ४४६ गावांचा एमएमआरडीएत समावेश, अलिबाग-रोहा येथे बल्क ड्रग पार्क, नवी मुंबई परिसरात वैद्यकीय, शैक्षणिक संस्थांना उद्योग म्हणून परवानगी, काजू बोर्डसाठी २०० कोटी, मच्छिमारांसाठी ५० कोटींचा कोष, त्यांना पाच लाखांचा विमा या उपलब्धींकडे फडणवीस सभांमधून लक्ष वेधतात.

नैसर्गिक पर्यटन स्थळांसाठी ६७० कोटी

- रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील १२ रेल्वे स्थानकांवर पायाभूत सुविधा, रत्नागिरी: कोस्टल सर्किट पर्यटनविकास, ९६ विविध पुरातन, धार्मिक.

- नैसर्गिक पर्यटन स्थळांसाठी ६७० कोटी,  जयगड येथे सुसज्ज बंदर उभारणी, जेएसडब्ल्यू-जयगड बंदर येथे पीपीपी तत्त्वावर एनएनजी टर्मिनल, सिंधुदुर्गात ग्रीनफिल्ड विमानतळ, नापणे (वैभववाडी) ऊस संशोधन केंद्र, सागरी संशोधन केंद्र, सी वर्ल्ड, स्कुबा.

- डायव्हिंग, वॉटर स्पोर्टस, देवगड आंबा म्युझियम, वेंगुर्ला पाणबुडी प्रकल्प या उपलब्धींद्वारे ते विकासाचा अजेंडा सांगतात.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुती