शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का; माजी आमदार करणार भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 10:16 IST

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्यापासून अवधूत तटकरे पक्षात काहीसे बाजूला गेले होते.

अलिबाग - राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आणि माजी आमदार अवधूत तटकरे हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. तटकरेंसोबत झालेल्या वादानंतर अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. २०१४ मध्ये अवधूत तटकरे हे श्रीवर्धन मतदारसंघातून निवडून आले होते. परंतु २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या जागेवर शिवसेनेने अवधूत तटकरेंना उमेदवारी न देता विनोद घोसाळकर यांना उमेदवारी दिली होती. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्यापासून अवधूत तटकरे पक्षात काहीसे बाजूला गेले होते. शिवसेनेत अवधूत तटकरेंना फारसा प्रभाव पाडता आला नाही. मधल्या काळात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आल्याने अवधूत तटकरे सक्रीय नव्हते. त्यामुळे शिवसेनेत राजकीय भवितव्य नाही हे ओळखून त्यांनी भाजपाशी जवळीक साधली. आता अवधूत तटकरे भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. 

काका-पुतण्यांमध्ये वादसुनील तटकरे आणि अवधूत तटकरे यांच्यात वाद झाल्याने अवधूत तटकरेंनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता. सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन मतदारसंघातून कन्या आदिती तटकरेंना उभे करणार असल्याचं समोर आले होते. पेण विधानसभा निवडणुकीत तटकरे कुटुंबात असेच कलह झाले होते. सुनील तटकरे यांचे थोरले बंधू अनिल तटकरे यांनी काँग्रेस -राष्ट्रवादी पक्षाची आघाडी असतानाही पेणमधून आघाडीच्या विरोधात उमेदवारी केली. या उमेदवारीमुळे झालेल्या मतविभागणीचा फटका बसून आघाडीचे उमेदवार माजी मंत्री रवींद्र पाटील यांचा पराभव झाला होता. त्यावेळी कौटुंबिक वाद असल्याचे चित्र निर्माण करून तटकरेंनी दगा केल्याचा जाहीर आरोप रवी पाटील यांनी केला होता. मात्र २०१९ मध्ये या वादातूनच अवधूत यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. 

२०१४ च्या निवडणुकीत निसटता विजय२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघातून अवधूत तटकरे यांचा निसटता विजय मिळवला होता. या निवडणुकीत अवधूत तटकरे यांना ६१,०३८ मते मिळाली. तर शिवसेनेचे रवी मुंडे यांना ६०९६१ मते मिळाली होती. २०१९ ला अवधूत तटकरे, वडील माजी आमदार अनिल तटकरे व भाऊ संदीप तटकरे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला होता. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाsunil tatkareसुनील तटकरेBJPभाजपा