शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सात - बारांसाठी सर्व्हर पुरेना, क्लाऊडवर जाता येईना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 19:37 IST

सर्व्हरची क्षमता कमी पडत असल्याने सुमारे आठ महिन्यांपासून डिजिटल सातबारा तयार करण्याचे काम बंद पडले आहे.

ठळक मुद्देशासनाकडून धोरणात सातत्याने बदल : डिजिटल उताऱ्यांचे काम ठप्पडिजिटल सातबारा उतारे उपलब्ध करून देण्याबाबत महसूल विभागाकडून काही उद्दिष्टे निश्चित

पुणे:  राज्यातील सर्व जमिनधारकांना डिजिटल स्वरूपातील सातबारा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वकांक्षी उपक्रम राज्याच्या महसूल विभागाने हाती घेतला. मात्र, डिजिटल माहिती साठवून ठेवण्यासाठी सर्व्हरची क्षमता कमी पडत असल्याने सुमारे आठ महिन्यांपासून डिजिटल सातबारा तयार करण्याचे काम बंद पडले आहे. क्लाऊडवर जाण्याबाबत शासनाने वेळोवेळी बदललेल्या धोरणामुळे हे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असल्याचे शासकीय अधिकारी सांगत आहेत.सातबारा उतारे मिळविण्यासाठी हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी राज्य शासनाने ई-फेरफार प्रकल्पांतर्गत डिजिटल सातबारा उतारे आॅनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेतले आहे.मात्र, डिजिटल स्वाक्षरी असलेले उतारे तयार करून त्याचे जतन करण्यासाठी सर्व्हरची जागा कमी पडत आहे. त्यामुळे महसूल विभागाला हे काम थांबवावे लागले. त्यातच स्टेट डेटा सेंटर बंद करण्याचे धोरण स्वीकारून शासनाने सर्व सरकारी कार्यालयांना क्लाऊडवर जाण्याबाबत आदेश दिले. मात्र, क्लाऊडवर जाण्यासही शासनाच्या आदेशामुळेच विलंब झाला आहे.त्यामुळे राज्यातील डिजिटल सातबारा उतारे तयार करण्याचे काम पूर्णपणे बंद पडले आहे. क्लाऊडवर गेल्याने डिजिटल सातबारा उतारे तयार करण्याचे काम सुरू करता येणे शक्य आहे. जानेवारी २०१८ मध्ये क्लाऊडवर जाणे अपेक्षित होते. परंतु,शासनाकडूनच क्लाऊडवर जाण्यासंदर्भातील धोरण मे महिन्यात प्रसिध्द करण्यात आले.शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे १६ व १९ मे रोजी क्लाऊडवर जाण्यासाठी कोणत्या नियमांचे व अटींचे पालन करावे,हे अध्यादेशानुसार स्पष्ट करण्यात आले.त्यानुसार सर्व कार्यालयांनी निविदा काढल्या. तसेच क्लाऊडवर जाण्यासाठी योग्य असणा-या कंपन्या निश्चित करण्याची प्रक्रिया राबवली. परंतु, शासनाने मे महिन्यात काढलेल्या अध्यदेशांना स्थगिती देवून निविदा प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिले. त्यानंतर ४ आॅगस्ट रोजी पुन्हा एकदा क्लाऊडवर जाण्यासंदर्भातील अध्यादेश प्रसिध्द केला. पूर्वीच्या अध्यादेशातील क्लाऊड कंपन्यांसाठीचे दर आणि आॅगस्ट महिन्यात काढलेल्या अध्यादेशातील दर यात सुमारे एकतृतीयांश एवढा फरक आहे.शासनाने क्लाऊड संदर्भातील दर कमी केल्याने शासकीय कार्यालयांकडून पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. अद्याप क्लाऊडवरून काम करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही.परिणामी डिजिटल सातबारा उतारे तयार होत नाहीत.त्यामुळे महसूल विभागाचे कर्मचारी व अधिकारीही हतबल झाले आहेत....................राज्यातील नागरिकांना डिजिटल सातबारा उतारे उपलब्ध करून देण्याबाबत महसूल विभागाकडून काही उद्दिष्टे निश्चित करण्यात आले होती. मात्र,त्यात वेळोवेळी बदल करण्यात आला. नागरिकांना १ आॅगस्ट २०१८ पर्यंत उतारे मिळतील,अशी घोषणा शासनातर्फे  करण्यात आली होती. परंतु, क्लाऊडवर जाण्यासंदर्भातील धोरणाला विलंब होत असल्याने शासनाला आपलाच शब्द पाळता आला नाही.

टॅग्स :PuneपुणेdigitalडिजिटलonlineऑनलाइनFarmerशेतकरी