शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणी कामगारांसाठी स्वतंत्र कायदा येणार; कामाला संरक्षण, आरोग्य, शिक्षणाची हमी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 15:05 IST

कामगारांना विम्याचे पूर्ण सरंक्षण असेल. कामाची शाश्वती, आरोग्याची व अपत्यांच्या शिक्षणाची हमी हा कायदा देणार आहे.

ठळक मुद्देप्रारूपाचे काम सुरू: कामगारांची मागील अनेक वर्षे विविध स्तरावर होणारी हेळसांड थांबणार

राजू इनामदार-पुणे: राज्यातील १२ लाख ऊसतोडणी कामगारांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने स्वतंत्र कायदा तयार केला जात आहे. त्यामुळे या कामगारांची मागील अनेक वर्षे विविध स्तरावर होणारी हेळसांड थांबणार आहे. माथाडी कामगारांसाठी आहे तसा किंवा कदाचित त्यापेक्षा प्रगत असा हा कायदा असेल. त्याचे प्रारूप तयार करणारे राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले, " ऊसतोडणी कामगार कामासाठी राहत्या घरातून निघून, प्रत्यक्ष काम करून पुन्हा घरी येईपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीला कायद्याचे अधिष्ठान असेल. कारखाना, मुकादम, कामगार यांच्यात कामासंबधी मुदतीचे, मजुरीचे करार मदार होत असतात. ते या कायद्याखाली येतील. कामगारांना विम्याचे पूर्ण सरंक्षण असेल. कामाची शाश्वती, आरोग्याची व अपत्यांच्या शिक्षणाची हमी हा कायदा घेईल. कारखाना व महामंडळ यांच्या जबाबदाऱ्या कायद्याने निश्चित होतील. केंद्रात तसेच राज्यातही असंघटीत कामगारांसाठी कायदा आहे, पण त्यात या क्षेत्राचा विचारच केलेला नाही, त्यामुळे हा कायदा एकमेव असेल."

ऊसतोडणीसारखे कष्टाचे काम या कामगारांकडून केले जाते. त्यासाठी त्यांंना दरवर्षी राहत्या गावातून कुटुंबासहित तब्बल २०० ते ३०० किलोमीटर प्रवास करावा लागतो. काम हंगामी म्हणजे ४ ते ६ महिन्यांचे असते. मुकादमाच्या सांगण्यावर त्यांना नाचावे लागते. आरोग्य, शिक्षण, मजूरी अशा सर्वच स्तरावर या इतक्या मोठ्या वर्गाची पिळवणूक होते. त्यामुळेच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे या कायद्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न करत आहेत. सामाजिक न्याय विभागाचे सचिव शाम तागडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कायद्याचे प्रारूप तयार होत आहे. येत्या महिनाभरात ते तयार होईल व मुंडे यांच्याकडून मंत्रिमंडळाला सादर केले जाईल. मंजूरी मिळून त्याचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर ऊसतोडणी कामगारांसाठी स्वतंत्र कायदा तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे असे डॉ. नारनवरे म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेLabourकामगारState Governmentराज्य सरकारDhananjay Mundeधनंजय मुंडे