शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

परमबीर सिंहांकडून पुन्हा खळबळजनक दावा; 'मातोश्री, सिल्वर ओक' वरील बैठकीत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 18:00 IST

परमबीर सिंह यांच्याकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 

मुंबई - राजकीय फायद्यासाठी विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी मविआतील नेत्यांकडून माझ्यावर दबाव आणला जात होता. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पैशांचा व्यवहार झाल्याची शक्यता आहे. पात्रतेच्या आधारे केलेल्या बदल्यांना मंत्रालयातून स्थगिती देण्यात आली होती असं सांगत माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मविआ नेत्यांवर खळबळजनक दावे केले आहेत. 

परमबीर सिंह म्हणाले की, माझ्यावर मविआ सरकारने त्यांच्या राजकीय विरोधकांवर बेकायदेशीर कारवाई करण्यासाठी दबाव आणला गेला. अनिल गोटे हे माजी आमदार आहेत, त्यांची सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्यासोबत अनिल देशमुखांच्या बंगल्यावर बैठक झाली होती. जयकुमार रावल, गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करावा याचा दबाव होता. मी त्यास नकार दिला, त्यानंतर मला सिल्वर ओकवर बोलवलं गेले. त्याठिकाणीही अनिल देशमुख आणि ही मंडळी उपस्थित होती. शरद पवारांच्या उपस्थितीत ही बैठक झाली होती. २०२० सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हे घडलं होते. जयंत पाटील यांच्या ऑफिसलाही मला बोलावले होते. केवळ जयकुमार रावल, गिरीश महाजन नाही तर जयंत पाटील यांनी त्यांचे सांगली जिल्ह्यातील विरोधक आहेत, ज्यांचे कुठलेतरी मेडिकल कॉलेज आहे त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यास सांगितले. मेडिकल कॉलेजवर धाड टाकावी असा दबाव जयंत पाटलांनी टाकला असं त्यांनी म्हटलं. एबीपी माझाच्या मुलाखतीत ते बोलत होते. 

त्याशिवाय मला एकदा मातोश्रीवर बोलावले होते, तिथे अनिल देशमुख उपस्थित होते. मुंबई बँकेप्रकरणी प्रविण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास मला सांगितले. मात्र या प्रकरणात तपास पूर्ण झाला होता. तिथेही मी गुन्हा दाखल करण्यास साफ नकार दिला. राजकीय विरोधकांविरोधात पोलिसांचा वापर करण्याचा प्रयत्न वारंवार मविआ नेत्यांनी केला. राजकीय फायद्यासाठी पोलिसांचा वापर होऊ देणार नाही यावर मी अडून राहिलो असा दावा परमबीर सिंह यांनी केला आहे. 

दरम्यान, माझ्याकडील पुरावे मी सुप्रीम कोर्टात सादर केलेत. अनिल देशमुखांनी वैयक्तिक शेरा मारलेली पत्रे माझ्याकडे आहेत. कुणाच्या सांगण्यावरून कोणाची पोस्टींग कुठे करायची आहे ते लिहिलेले आहे. ईडी, सीबीआयकडे ते दिलेत. अनिल देशमुखांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेली पत्रे आहे. जुलै २०२० मध्ये मी एसीपींची बदली त्यांच्या पात्रतेवर केली होती. चांगले अधिकारी नेमले होते. मात्र त्या बदलीला कुठलंही कारण न देता स्थगिती दिली होती. मुख्यमंत्र्यांचे, गृहमंत्र्यांचे आदेश आहेत असा मला मेसेज आला. त्यानंतर ३-४ दिवसांत त्याच अधिकाऱ्यांची बदली केली. त्यातील जे प्रामाणिक होते त्यांना बाहेर काढले गेले. यामागे काय प्रकार आहे हे सांगण्याची गरज नाही असं सांगत परमबीर सिंहांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून मविआ नेत्यांवर निशाणा साधला. 

"त्या बदल्या का रोखल्या, कारण दिलं नाही"

मुंबई पोलीस दलात होणाऱ्या बदल्यांचा अधिकार पोलीस आस्थापना बोर्डाला असते, त्याचे प्रमुख कमिश्नर ऑफ मुंबई पोलीस असतात. मेरिटच्या आधारे आम्ही बदल्या केल्या होत्या. मात्र त्यावर स्थगिती देण्याचे वरून आदेश आले. अतिरिक्त मुख्य सचिवांनी मला स्वत: मेसेज केला होता त्या बदल्यांना स्थगिती दिली, जे अधिकारी आहेत त्यांना जैसे थे   स्थितीत ठेवायला सांगितले. या बदल्या का रोखल्या मला कधी सांगितले गेले नाही. या बदल्या रोखण्यामागे काय असतं हे सगळ्यांना ठाऊक, अधिकाऱ्यांकडून पैसे घेण्याचा हा प्रकार असतो. पैसे काढले की नाही माहिती नाही. मला बदल्यांना स्थगिती का दिली, नियमांचे उल्लंघन झालं का असं काही कारण दिले नाही असं परमबीर सिंह यांनी म्हटलं. 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगMahavikas Aghadiमहाविकास आघाडीAnil Deshmukhअनिल देशमुख