Sushil Kumar Shinde: “चुकांमुळे काँग्रेस कमकुवत झाला, पंजाब पराभवासाठी ‘या’ २ व्यक्ती कारणीभूत”: सुशीलकुमार शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 01:05 PM2022-03-20T13:05:38+5:302022-03-20T13:07:19+5:30

Sushil Kumar Shinde: सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे कौतुक करत, सर्वधर्मसमभाव मानणारी युवकांची फळी तयार करायला हवी, असे म्हटले आहे.

senior leader sushil kumar shinde statement on congress loses in five state and other issues | Sushil Kumar Shinde: “चुकांमुळे काँग्रेस कमकुवत झाला, पंजाब पराभवासाठी ‘या’ २ व्यक्ती कारणीभूत”: सुशीलकुमार शिंदे

Sushil Kumar Shinde: “चुकांमुळे काँग्रेस कमकुवत झाला, पंजाब पराभवासाठी ‘या’ २ व्यक्ती कारणीभूत”: सुशीलकुमार शिंदे

googlenewsNext

मुंबई: देशभरातील पाच राज्यांच्या निवडणूक निकालात काँग्रेसला सपाटून पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर काँग्रेसमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. काँग्रेसमधील नाराज असलेल्या जी-२३ गटांच्याही काही बैठका पार पडल्या. काँग्रेसचा झालेला पराभव आणि काँग्रेसची एकूणच आताची परिस्थिती यासंदर्भात काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसत आहे. यातच आता माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसच्या पराभवावर भाष्य करत अप्रत्यक्षरित्या काँग्रेसच्या नाराज गटाचे समर्थन केले आहे. काँग्रेस हा अनेक चुकांमुळे कमकुवत झाला असून, पंजाबमधील पराभवाला दोन व्यक्ती जबाबदार असल्याचे म्हटले आहे. 

सुशीसकुमार शिंदे यांनी एका वृत्तपत्रात लेख लिहिला असून, यामध्ये निवडणुकांचे निकाल आणि एकूणच काँग्रेसमधील परिस्थिती यावर भाष्य केले आहे. निर्णायक लढतीत सतत येणार्‍या अपयशामुळे हा पक्ष अस्तित्वहीन होताना दिसतो आहे. स्वतःची ताकद असलेल्या पंजाबसारख्या राज्यातही लाथाळ्यांमुळे काँग्रेसला सत्ता राखता आली नाही. शेतकरी आंदोलनावरून स्थानिक लोकांचा भाजपवर असलेला रोष या पक्षाला मतांमध्ये परावर्तीत करता आला नाही. एका अर्थानं सगळीकडेच नेतृत्व आणि संघटनेच्या पातळीवर काँग्रेस कमकुवत होत असल्याचे चित्र निर्माण झाल्याचे सुशीरकुमार शिंदे यांनी म्हटले आहे. 

देशात सक्षम विरोधी पक्षाची पोकळी दिवसेंदिवस विस्तारतेय

देशात सक्षम विरोधी पक्षाची पोकळी दिवसेंदिवस विस्तारत असताना एका मोठ्या पक्षाचे चिन्ह होणं लोकशाहीच्या दृष्टीने चांगले लक्षण नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये नेमकं कुठं चुकलं, काय करायला हवे आणि देशातील सध्याची एकूणच राजकीय स्थिती यावरही सुशीलकुमार शिंदे यांनी आपले मत मांडले आहे. सुशिलकुमार शिंदे यांनी आपल्या लेखात पंजाबमध्ये काँग्रेसच्या पराभवाचे खाप हे नवज्योतसिंह सिद्धू आणि माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर फोडले आहे. पंजाबमध्ये या दोघांचे नेतृत्व कुचकामी ठरले आहे. दोघांच्या वर्तणुकीमुळे सरकार येऊ शकले नसल्याचा दावा सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. पंजाबमध्ये ३२ टक्के मागासवर्गीय जनता आहे. त्या वर्गाचे प्रतिनिधीत्व करणारा नेता मुख्यमंत्री असतानाही पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आली नाही. पंजाबमध्ये संघटन आणि प्रशासन या दोन्ही ठिकाणी पक्ष कुमकुवत झाले, असे शिंदे यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. 

दरम्यान, सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे कौतुक केले आहे. अनेक कठीण प्रसंगात त्यांनी सरकार आणि पक्ष टिकवून ठेवला आहे. परिस्थिती पलटवण्यात त्या यशस्वी होतील. तसेच सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. जे काँग्रेस सोडून गेले आहेत, त्यांना परत आणण्याचे प्रयत्न करायला हवेत. तसेच सर्वधर्मसमभाव मानणारी युवकांची फळी तयार करायला हवी असे ते म्हणाले.
 

Web Title: senior leader sushil kumar shinde statement on congress loses in five state and other issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.