शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

हृदयाची बायपास सर्जरी झालेले मुंबईतील ज्येष्ठ नागरिक धावणार लोकमतच्या औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 9:01 PM

बायपास सर्जरी झाल्यानंतर कुणी धावत असेल यावर आपला विश्वास बसणार नाही.

ठळक मुद्दे बायपास सर्जरी झाल्यानंतर कुणी धावत असेल यावर आपला विश्वास बसणार नाही, शिवाय २१ किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये ते धावतील हे अशक्यच आहे, असंही तुम्ही म्हणाल. हृदयाची बायपास सर्जरी झालेले मुंबईतील काही ज्येष्ठ नागरिक ‘लोकमत’तर्फे रविवारी औरंगाबादमध्ये होत असलेल्या महामॅरेथॉनमध्ये धावणार आहेत.

औरंगाबाद- बायपास सर्जरी झाल्यानंतर कुणी धावत असेल यावर आपला विश्वास बसणार नाही, शिवाय २१ किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये ते धावतील हे अशक्यच आहे, असंही तुम्ही म्हणाल. हृदयाची बायपास सर्जरी झालेले मुंबईतील काही ज्येष्ठ नागरिक ‘लोकमत’तर्फे उद्या रविवारी औरंगाबादमध्ये होत असलेल्या महामॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. यामध्ये अगदी पंचाहत्तरी गाठलेलेही तरुणतुर्क आहेत.

बायपास झालेल्या तरीही शरीरात प्रचंड ऊर्जा असलेल्या बारा ते तेरा जणांचा हा ग्रुप रविवारी अगदी पहाटेच औरंगाबादच्या गारखेडा भागातील विभागीय क्रीडा संकुलावर धावण्यासाठी सज्ज राहणार आहे. बायपास सर्जरी झाल्यानंतर आपण समाजावर आणि परिवारावर ओझं होऊ का, अशी मनात भीती न बाळगता ही मंडळी धावायला लागली. त्यांना व्यंकटरमण पिचुमणी यांचं मार्गदर्शन लाभलं आणि आता हा बारा-तेरा जणांचा ग्रुप देशभरातील विविध मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असतो.

या ग्रुपमधील सदस्यांनी लोकमत भवन येथे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांची भेट घेतली. औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये धावण्याच्या भूमिकेबाबत या ज्येष्ठ नागरिकांनी संपादकीय विभागातील कर्मचाऱ्यांशी चर्चाही केली.

बायपास सर्जरी झाली म्हणजे आपल्या हालचालींवर मर्यादा आल्या, असंच अनेक जण समजतात. मात्र, या समाजाला छेद देण्याचं काम या ज्येष्ठ नागरिकांनी केलं आहे. बायपास झाली म्हणजे स्वत:ला आजारी समजणारे, तसंच व्हीलचेअरचा वापर करणारेही अनेक जण दिसतात. या सर्वांना ऊर्जा देण्याचे आणि मनात ऊर्मी भरण्याचे काम या ग्रुपतर्फे होताना दिसत आहे.

अर्थात महामॅरेथॉनमध्ये धावणारी ही सर्व मंडळी अतिशय ताजीतवानी असल्याचं दिसलं. गेल्या काही दिवसांत किंवा वर्षांत धावण्याच्या सरावामुळे ही मंडळी शारीरिकदृष्ट्या अगदी ‘फिट’ आहेत आणि मनानेही तरुण आहेत. नियमित ‘एक्सरसाईज’ आणि ‘चिअरफुल लाईफ’ असं त्यांचं जगणं आहे.

यापैकी अनेक जण स्वत:चा व्यवसायही उत्तमपणे सांभाळत आहेत. या ग्रुपमधील व्यंकटरमण पिचुमणी वगळता सर्वच सदस्य हे बायपास सर्जरी झाल्यानंतर धावायला लागले. सर्जरी होण्याआधी यांच्यापैकी कुणीही धावत नव्हते आणि आता तर अगदी प्रोफे शनल मॅरेथॉनमध्ये ते धावत आहेत. मनात जिद्द असली की, कोणतीही गोष्ट अशक्य नाही, याची प्रचीती या ग्रुपने आणून दिली आहे. याचे श्रेय मार्गदर्शक व्यंकटरमण पिचुमणी यांना आणि या ज्येष्ठांच्या जिद्दीला जाते. तरुणांना लाजवेल आणि ज्येष्ठांना मार्गदर्शक ठरेल, अशीच या ग्रुपची कामगिरी आहे.

ग्रुपच्या याच जिद्दीने त्यांना मुंबईहून औरंगाबादेत खेचून आणलं आहे. या ग्रुपला औरंगाबादचेही काहीजण जॉईन झाले आहेत. रविवारी पहाटे या ग्रुपचे बारा ते तेरा सदस्य महामॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन रस्त्यावरून धावतील तेव्हा औरंगाबादकर निश्चितच त्यांच्या जिद्दीला सलाम करतील.