शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
5
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
6
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
7
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
8
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
9
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
10
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
11
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
12
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
13
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
14
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
15
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
16
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
17
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
18
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
19
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
20
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाड धमकीपत्राचा शोध सुरू

By admin | Updated: March 10, 2015 04:10 IST

राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि मुंब्रा-कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आलेल्या कथित धमकीपत्राचा सध्या नौपाडा पोलीस आणि गुन्हे अन्वेषण

ठाणे : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि मुंब्रा-कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आलेल्या कथित धमकीपत्राचा सध्या नौपाडा पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास केला जात आहे. त्यांना पुरेसे संरक्षण देण्यात आले असून धमकीतील हस्ताक्षराचे संशोधन केले जात असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.या आंतर्देशीय पत्रात म्हटले आहे की, ‘हे नथुराम चक्र आहे. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आता नंबर जितेंद्र आव्हाड आपला आहे. तुमचा निकाल लवकरच लागेल. हा महाराष्ट्र श्री. नथुराम गोडसे विचारसरणीचा आहे, हे आम्हाला पटवून द्यायचे आहे. ही आमची बांधिलकी आहे. हे पत्र नव्हे प्रतिज्ञापत्र आहे.’ असा उल्लेख पत्रात आहे. शेवटी ‘आपला नम्र, नथुराम विचार मंच,’ असेही लिहिण्यास धमकी देणारा विसरलेला नाही. या धमकीची ठाणे पोलिसांनी दखल घेतली असून गुन्हे अन्वेषण विभागाबरोबरच नौपाडा पोलीसही तपास करीत असल्याचे प्रभारी पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी सांगितले. अशा प्रकारचे हस्ताक्षर कोणाचे असू शकते, कोण पत्र लिहू शकते, अशी कोणती संघटना अस्तित्वात आहे का, या सर्व बाबींचा तपास सुरू आहे. आ. आव्हाड यांना वाय दर्जाची सुरक्षा आधीच पुरविण्यात आलेली आहे. त्यांच्या घरीही संरक्षण देण्यात आले असल्याची माहिती मणेरे यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यांना यापूर्वीही दोनदा धमकी आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)