शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

माळीणच्या ढिगा-यात जिवांचा शोध सुरूच

By admin | Updated: August 1, 2014 09:07 IST

देव तारी त्याला कोण मारी!’ या म्हणीचा सुखद प्रत्यय माळीण दुर्घटनेत आला

माळीण (ता. आंबेगाव) : ‘देव तारी त्याला कोण मारी!’ या म्हणीचा सुखद प्रत्यय माळीण दुर्घटनेत आला. अख्ख्या गावावर डोंगर कोसळल्यावर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मायलेकाला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. गुरुवारी रात्रीपर्यंत ढिगाऱ्याखाली ४४ मृतदेह सापडले. अद्यापही २०० ग्रामस्थ चिखलाच्या राडारोड्याखाली अडकले असण्याची भीती असून, या जिवांचा ढिगाऱ्याखाली शोध घेणे सुरूच आहे. माळीणवर बुधवारी सकाळी डोंगराची महाकाय दरड कोसळल्यानंतर दोन तासांच्या आतच मदतकार्य सुरू झाले. मात्र, प्रचंड पावसामुळे मदतकार्यात अडचणी येत होत्या. रात्रभर सर्चलाईटच्या प्रकाशात चिखलाचे ढिगारे उपसण्यात येत होते. सायंकाळच्या सुमारास एक महिला जीवंत सापडल्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनाही (एनडीआरएफ) हुरूप आला होता. मात्र, रात्रभरात केवळ तीनच मृतदेह सापडू शकले. आज सकाळपासून काम आणखी वेगाने सुरू झाले. चार पोकलेन मशीनच्या साहाय्याने ढिगारा उपसण्यास सुरुवात झाली. मात्र, गावाचा परिसर चिंचोळा असल्याने आणि दुसऱ्या बाजूला डोंगर असल्याने एकाच बाजूने उत्खनन सुरू होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत गावातील मारुती मंदिराच्या परिसरापर्यंतचाच ढीग हटविणे शक्य झाले होते. मुख्य गावाचा परिसर मंदिरानंतरच सुरू होत असल्याने बहुतांश घरांवरील चिखलाचा ढीग हटविणे अशक्य झाले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण चिखल हटविण्यास किमान पाच ते सहा दिवस लागू शकतात. त्यानंतरच मृतांचा निश्चित आकडा कळू शकणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे भेट देऊन दुर्घटनेत बचावलेल्या ग्रामस्थांना धीर दिला. दुसरीकडे डोंगररांगात पडकई कार्यक्रम राबविल्याने ही घटना घडल्याचा आरोप होत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश तळेकर यांनी याबाबत घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला.