शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालय सील करा!

By admin | Updated: July 29, 2016 03:35 IST

मुंबई एअरपोर्ट एम्प्लॉईज को आॅप क्रेडीट सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करुन दोषी असणाऱ्या संचालकांवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सहकार मंत्री

मुंबई : मुंबई एअरपोर्ट एम्प्लॉईज को आॅप क्रेडीट सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करुन दोषी असणाऱ्या संचालकांवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. या संस्थेचे कार्यालयसुद्धा सील करण्याचे आदेश देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. मुंबई एअरपोर्ट एम्प्लॉईज को आॅप सोसायटीतील संचालक मंडळाकडून गैरकारभार सुरु असल्याची तक्रार सुधाकर देशमुख यांनी लक्षवेधीद्वारे सभागृहात केली. सोसायटीत निवडणूक घेण्यात आलेली नाही. सन २००८ ते २०१५ या काळात देण्यात आलेल्या कर्जाचा तपशिल सोसायटीकडे नाही. सोसायटीचे चेअरमन स्वत:ची रक्कम गुंतवून आपला उद्योग करीत आहेत. संस्थेच्या दप्तराची तपासणी करण्यात आली असता उपलब्ध कागदपत्राच्या आधारे तपासणी केली असता तक्रारदाराच्या तक्रारीत तथ्य आढळले, त्यामुळे सहायक निबंधक यांच्या आदेशानुसार संस्थेवर प्राधिकृत अधिकारी म्हणून लेखापरीक्षक अनिरुद्ध सेनगांवकर यांची नियुक्त करण्यात आली होती. परंतु त्यास विभागीय सहनिबंधक मुंबई यांनी स्थगिती दिली, अशी माहितीही मंत्री देशमुख यांनी सभागृहाला दिली. (प्रतिनिधी)आॅडीट झालेले नाहीसंस्थेचे आॅडीट झालेले नाही. यासंदर्भात सोसायटीचे सचिवांनी सहायक निबंधकाकडे तक्रार केली आहे. या गैरव्यवहाराकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे, म्हणून तातडीने संचालकमंडळ बरखास्त संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली होती.