शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

पटकथा तीच, नायक नवा - उद्धव ठाकरेंचे भाजपावर टीकास्त्र

By admin | Updated: February 23, 2015 09:45 IST

नरेंद्र दाभोलकर प्रकरणात झाले तेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रकरणातही घडले. राज्यात 'नायक' नवा असला तरी 'पटकथा' जुनीच आहे असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर सोडले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २३ - शिवसेना व भाजपामधील धुसफूस सुरुच असून सोमवारी उद्धव ठाकरेंनी सामनामधून राज्यातील सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला आहे. नरेंद्र दाभोलकर प्रकरणात झाले तेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रकरणातही घडले. राज्यात 'नायक' नवा असला तरी 'पटकथा' जुनीच आहे असे टीकास्त्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपामध्ये 'सामना' सुरु असून उद्धव ठाकरे मुखपत्रातून भाजपावर वारंवार टीका करत आहेत. सोमवारीही उद्धव ठाकरेंनी नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येवरुन गृहखात्याची जबाबदारी असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.  पानसरे यांचे मारेकरी पकडण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करेल असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. दाभोलकरांची हत्या झाली तेव्हा काँग्रेसचे मुख्यमंत्री व राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांनीही हेच आश्वासन दिले होते. दुर्दैवी बाब म्हणजे दाभोलकरांचे मारेकरी १८ महिन्यानंतरही मोकाटच आहेत. तर पानसरेंचे मारेकरीही पकडले गेलेेले नाही असे उद्धव ठाकरेंनी निदर्शनास आणून दिले.

पोलिसांनी ताकद लावली तर मारेकरी सापडतील असे मुख्यमंत्री म्हणतात. गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असून असे विधान करुन फडणवीस पोलिसांवर अविश्वास दाखवत आहे. मारेक-यांनी व्यवस्थेला आव्हान दिले असेल तर मुख्यमंत्र्यांनी आधी राज्यातील व्यवस्था बदलावी. दुस-यांवर खापर फोडण्याऐवजी याविषयावर मंत्रिमंडळात चर्चा करावी असा सल्लाही ठाकरेंनी दिला. आत्मचिंतन करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी आता कृती करावी असेही त्यांनी म्हटले आहे.