शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

‘धूत ट्रान्समिशन’ विकत घेणार स्कॉटलंडची कंपनी

By admin | Updated: June 23, 2017 02:09 IST

जागतिक बाजारपेठेत आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी ‘धूत ट्रान्समिशन’ या कंपनीने स्कॉटलंडमधील ‘टीएफसी केबल्स असेंब्लिज लिमिटेड’ ही कंपनी खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जागतिक बाजारपेठेत आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी ‘धूत ट्रान्समिशन’ या कंपनीने स्कॉटलंडमधील ‘टीएफसी केबल्स असेंब्लिज लिमिटेड’ ही कंपनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यवहाराचा तपशील अद्याप उघड करण्यात आलेला नसून लवकरच याबाबत घोषणा केली जाणार आहे.युरोपमध्ये व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने कंपनीचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या करारामुळे धूत ट्रान्समिशनला पश्चिम युरोपातील बाजारपेठेत अधिक जोरकसपणे प्रवेश करणे सुकर होईल. मुंबईस्थित गुंतवणूक बँक सिंगी अ‍ॅडव्हायजर्स हे या व्यवहाराचे सल्लागार आहेत. युरोप व भारतातील वाहन आणि औद्योगिक क्षेत्रासाठी विद्युत उपकरणे पुरवठा करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या धूत ट्रान्समिशनची स्थापना १९९९ साली झाली. एक लघु उद्योग म्हणून सुरुवात केल्यानंतर वायर हार्नेसिंग क्षेत्रातील झपाट्याने वाढणारी कंपनी म्हणून धूत ट्रान्समिशनने नावलौकिक मिळविला. मागच्या १५ वर्षांत कंपनीचा सीएजीआर २० टक्क्यांपेक्षा अधिक वाढला आहे. आजमितीला कंपनीचे पुणे, औरंगाबाद, चेन्नई, मानेसर, पिथमपूर, इंग्लंड आणि स्लोव्हाकिया येथे १३ युनिटस् आहेत. व्होल्वो, पियाजियो, होंडा, बजाज आॅटो, रॉयल एनफिल्ड, सुझुकी आणि सीएनएच अशा स्थानिक व विदेशी कंपन्या धूत ट्रान्समिशनचे प्रमुख ग्राहक आहेत. तर, १९७१ साली स्थापन झालेल्या ‘टीएफसी केबल्स असेंब्लिज’चे स्कॉटलँड आणि स्लोव्हाकियामध्ये युनिटस् आहेत. ते वाहन उद्योगाला अ‍ॅनालिटिकल इन्स्ट्रूमेंटस्, वर्क अ‍ॅक्सेस प्लॅटफॉर्म, हिटिंग, व्हेंटिलेशन आणि कंट्रोल उपकरणे यासारखी उत्पादने पुरवितात.जागतिक बाजारपेठेकडे वाटचाल - राहुल धूतकंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राहुल धूत यांनी ‘टीएफसी’ खरेदीच्या वृत्ताला दुजोरा देताना म्हटले की, जागतिक बाजारपेठेत कंपनीचे प्रस्थ वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही हे पाऊल टाकले आहे. याआधीच कंपनीचा इंग्लंडमधील किंगस्टन अपॉन हल येथे कारखाना असून, एकूण उलाढालीच्या १५ टक्के निर्यात युरोप आणि इंग्लंडला केली जाते. आगामी तीन वर्षांत वार्षिक महसूल ६०० कोटींवरून १२०० कोटी रुपये करण्याचा मानस आहे. ‘टीएफसी’च्या खरेदीमुळे कंपनीच्या महसुलात १०० कोटी रुपयांची भर पडणार असून, पहिल्याच वर्षापासून नफ्यात वाढ दिसून येईल. यावर्षी ‘टीएफसी’व्यतिरिक्त इंग्लंडमधील आणखी एक कंपनी आम्ही खरेदी करणार असून, त्याविषयीच्या वाटाघाटी सुरू आहेत.