शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

School: दप्तर भरले, शाळा कधी ? मुंबईतील शाळा १५ डिसेंबरला, ग्रामीण भागात आजपासून किलबिलाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 07:49 IST

Coronavirus News: राज्यातील बहुतांश शाळा आज, बुधवारपासून अनलॉक होत असल्या तरी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पुणे, पिंपरी चिंचवड, नांदेड या महापालिका क्षेत्रांमधील शाळांची घंटा उशिराच वाजणार आहे.

मुंबई : राज्यातील बहुतांश शाळा आज, बुधवारपासून अनलॉक होत असल्या तरी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पुणे, पिंपरी चिंचवड, नांदेड या महापालिका क्षेत्रांमधील शाळांची घंटा उशिराच वाजणार आहे. तर औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक महापालिकांनी शाळा सुरू करण्याबाबत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. 

ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे बहुतांश शहरी भागांत शाळा सुरू करण्याच्या तारखांमध्ये जिल्हा प्रशासनांनी स्थानिक परिस्थितीनुसार बदल केला आहे. कोरोना महासाथीच्या दरम्यान लॉकडाऊन करण्यात आल्याने १२ मार्च २०१९ पासून सर्व शाळा बंद होत्या. बहुतांश शाळांनी ऑनलाइन शिक्षण दिले. मात्र आता तब्बल दोन वर्षांनंतर पहिली ते सातवीच्या शाळांची घंटा वाजणार आहे.   

महापालिका क्षेत्रांत कधी?  १ डिसेंबरपासून  लातूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली१३ डिसेंबरपासून  नांदेड १५ डिसेंबरपासून  मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पुणे, पिंपरी-चिंचवडया ठिकाणी अद्याप निर्णय नाही कल्याण-डोंबिवली (बुधवारी निर्णय अपेक्षित)औरंगाबाद (१० डिसेंबर रोजी आढावा घेऊन निर्णय)नागपूर (१० डिसेंबर रोजी आढावा घेऊन निर्णय)नाशिक (१० डिसेंबरनंतर परिस्थिती पाहून निर्णय)

ग्रामीण भागात पाचवी ते बारावी, तर शहरात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने भरण्यास सप्टेंबरपासून सुरुवात झाली. शहरातील पहिली ते सातवीचे, तर ग्रामीण भागामधील पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आता भरणार आहेत. वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यासाठी बहुतेक शाळा सज्ज झाल्या आहेत.

मोठ्या पटाच्या शाळांतील वर्ग एक दिवसाआडशाळा सुरू करताना पालकांचे हमीपत्र घेतले जाणार आहेत. एका बाकावर एकच विद्यार्थी, याप्रमाणे बैठक व्यवस्था करण्याच्या सूचना शाळांना करण्यात आलेल्या आहेत. ज्या शाळांची पटसंख्या जास्त आहे, अशा शाळांनी दोन सत्रांत किंवा दिवसाआड विद्यार्थ्यांना बोलवावे, त्यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन होते किंवा नाही याची प्रत्यक्ष शाळेत जाऊन पाहणी केली जाणार आहे. त्यासाठी केंद्र समन्वयक, कार्यक्रम समन्वयक, पर्यवेक्षक, विषय शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

ही दक्षता आवश्यकशाळेत हात धुण्याची व्यवस्था, तसेच जंतुनाशक, हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करणे आवश्यकशाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर सर्व स्वच्छता व सुरक्षा मार्गदर्शन सूचनांचे काटेकोर पालनशाळा नजीकच्या महापालिका किंवा खासगी आरोग्य केंद्राशी संलग्नित करून घेणे आवश्यकजे विद्यार्थी ऑफलाइन वर्गासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत त्यांना ऑनलाइन शिकवणी आणि शिक्षकमित्र, पालकमित्र, गृहभेटी अशा माध्यमांतून शिक्षण सुरू ठेवणे आवश्यक

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस