School bells in Corona-free places only in June | कोरोनामुक्त ठिकाणी शाळांची घंटा जूनमध्येच

कोरोनामुक्त ठिकाणी शाळांची घंटा जूनमध्येच

विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याच्या दुर्गम भागात जिथे आॅनलाईनची कनेक्टिव्हिटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भावदेखील नाही तिथे जूनपासून शाळा सुरू होतील. याशिवाय आरोग्याची काळजी घेऊन शक्य तिथे शाळा सुरू करण्यात येतील. अन्य भागात आॅनलाईन शिक्षण सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी याबाबतचे निर्देश दिले.


व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की, जूनपासून शिक्षण सुरू करावे. शाळाच सुरू कराव्यात, असे नाही. आॅनलाईन, आॅफलाईन अशा सर्व पद्धतीने शक्य आहे, त्याप्रमाणे शिक्षण सुरू करावे. मुलांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही. ज्या शाळा क्वारंटाईन करण्यासाठी ताब्यात घेतल्या होत्या, त्यांचे निर्जंतुकीकरण शासन स्वत:च्या खर्चाने करून देईल.


यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार कपिल पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्यासमवेत डॉ. रघुनाथ माशेलकर, औरंगाबादचे अनिरुद्ध गरुड, लातूरचे प्राचार्य अनिरुद्ध जाधव, डॉ. अनिल पाटील आदी तज्ज्ञ उपस्थित होते.
या बैठकीत विनाअनुदानित संस्थांमधील शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे यावरही चर्चा झाली.

स्वतंत्र संगणकीय पद्धत
च्जिथे कनेक्टिव्हिटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा दुर्गम ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात.
च्प्रत्यक्ष शाळा सुरू करणे अडचणीचे आहे, त्याठिकाणी इतर पर्याय तसेच आॅनलाईन शिक्षण सुरू करावे.
च्गुगल प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक स्तरावर वापर करावा. मात्र, स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून आॅनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी विकसित करावी, असेही ते म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: School bells in Corona-free places only in June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.