शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; २० नोव्हेंबरपासून होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 19:30 IST

दहावीची परीक्षा ५ डिसेंबरपर्यंत  तर बारावीची १० डिसेंबरपर्यंत चालणार

ठळक मुद्देशाळा व महाविद्यालयांना विभागीय मंडळामार्फत छापील स्वरूपात दिलेले वेळापत्रक अंतिम

पुणे : इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी (दि. २०) जाहीर केले. त्यानुसार लेखी परीक्षा दि २० नोव्हेंबरपासून सुरू होणार असून दहावीची परीक्षा ५ डिसेंबरपर्यंत  तर बारावीची १० डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

राज्य मंडळाकडून सोमवारी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तसेच मंगळवारपासून या परीक्षांचे अर्ज भरण्यासही सुरूवात झाली आहे. आता मंडळाने या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पुणे, नागपुर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे. दि. २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत दहावीची तर दि. २० नोव्हेंबर ते १० डिसेंबरदरम्यान बारावी व द्विलक्षी अभ्यासक्रमाची परीक्षा होईल. इयत्ता बारावी व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा दि. २० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर दरण्यान घेतली जाणार आहे. इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा दि. १८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान होईल. बारावीच्या या परीक्षा दि. १८ नोव्हेंबर ते १० डिसेंबरदरम्यान होतील, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

दरम्यान, संकेतस्थळावरील वेळापत्रक हे केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपुर्वी शाळा व महाविद्यालयांना विभागीय मंडळामार्फत छापील स्वरूपात दिलेले वेळापत्रक अंतिम असेल. त्यानुसारच विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खात्री करावी. अन्य माध्यमातून आलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले आहे.-----------लेखी परीक्षेच्या सविस्तर वेळापत्रकासाठी :  www.mahahsscboard.in----------परीक्षांचे वेळापत्रक :इयत्ता दहावी - दि. २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबरइयत्ता बारावी (सर्वसाधारण व द्विलक्षी) - दि. २० नोव्हेबंर ते १० डिसेंबरइयत्ता बारावी (व्यवसाय अभ्यासक्रम) - दि. २० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर------------

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीexamपरीक्षाEducationशिक्षण