शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोर्ट म्हणते, निवडणुका जाहीर करा; मात्र, प्रत्यक्षात उजाडणार सप्टेंबर!

By यदू जोशी | Updated: May 5, 2022 05:34 IST

प्रभाग रचनेसह सर्व तयारीसाठी आयोगाला लागू शकतात तीन महिने

यदु जोशीमुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे अधिकार आपल्याकडे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्दबातल ठरवून या निवडणुकांचा कार्यक्रम १५ दिवसात जाहीर करा, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. मात्र, ही  निवडणूक विषयक प्रक्रिया पूर्ण करण्यास तीन महिने लागणार असल्याने प्रत्यक्ष मतदान सप्टेंबरमध्ये होईल, असे चित्र आहे. 

प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकारने एक कायदा करून स्वत:कडे घेतले होते. तथापि, प्रभाग रचनेसह सर्व निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने आता निवडणूक आयोगाला दिले आहेत. ही प्रक्रिया आयोगाने आधीच सुरू केली होती. मात्र, राज्य सरकारने कायदा केल्याने ११ मार्च २०२२ ला आयोगाने त्यास स्थगिती दिली होती. ज्या टप्प्यावर ही स्थगिती देण्यात आली होती. त्याच टप्प्यावरून आता निवडणूक आयोग पुढची प्रक्रिया सुरू करेल.ओबीसींचा इम्पिरिकल डाटा तयार झाला असेल तर त्या आधारे त्यांना आरक्षण देऊन निवडणुका घ्या आणि झाला नसेल तर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. डाटा तयार करण्यासाठी माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग सरकारने स्थापन केला असून त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आयोगाचा डाटा घेऊन आरक्षण वाचवायचे आणि सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करायची अशी राज्य सरकारची रणनीती असेल. यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी बैठक बोलविली आहे.

  • राज्यातील १५ महापालिका, २५ जिल्हा परिषदा, त्याअंतर्गतच्या २८४ पंचायत समित्या, २२० नगरपालिका आणि १५०० ग्राम पंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यातील पाच महापालिका वगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपलेली आहे. 
  • मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वसई विरार, कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग रचनेस अंतिम स्वरूप देणे बाकी आहे. 
  • औरंगाबाद महापालिकेच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू व्हायची आहे. भिवंडी-निजामपूर, पनवेल, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा या महापालिकांची मुदत   मे ते जुलैदरम्यान संपणार आहे. 

अधिक का लागणार वेळ?

  • महापालिका व नगरपालिकांच्या प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप देण्यास आयोगाला किमान २० ते २५ दिवस लागतील. त्यानंतर आरक्षणाची सोडत निघेल. मतदार यादी कार्यक्रम हाती घेतला जाईल. 
  • विधानसभा मतदार संघांच्या याद्यांच्या आधारे प्रभागनिहाय याद्या तयार केल्या जातील. त्यावरील हरकती-सूचनांसाठी दीड महिन्याचा अवधी लागेल. 
  • त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठीच्या पूर्वतयारीला १५ दिवस लागतील. हे लक्षात घेता निवडणूक प्रत्यक्ष जाहीर होण्यासाठी ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.  

निवडणुका होऊ घातलेल्या जिल्हा परिषदा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली.

सर्वोच्च न्यायालयाची नाराजी 

  • स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केल्यानंतर या निवडणुका घेण्याचे अधिकार राज्य सरकारने गेल्या ११ मार्चला आपल्याकडे घेतले होते. राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयात ए. एम. खानविलकर, न्या. सी. टी. रविकुमार व न्या. अभय ओक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. 
  • सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाच्या एकूण भूमिकेवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. आपण दिलेल्या निर्देशांचे पालन निवडणूक आयोगामार्फत होत नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक