Coronavirus: सावंतवाडी पोलिस निरीक्षक अॅक्शन मोडमध्ये; हॉटस्पॉट बनल्याने सर्वच यंत्रणा अलर्टवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 10:21 PM2021-05-29T22:21:08+5:302021-05-29T22:23:52+5:30

Coronavirus: वाढते कोरोना रूग्ण ठरतात डोकेदुखी : विनाकारण फिरणारे बनले लक्ष, सावंतवाडी हॉटस्पॉट बनल्याने सर्वच यंत्रणा अलर्टवर

sawantwadi police inspector come in action mode after hotspot of corona | Coronavirus: सावंतवाडी पोलिस निरीक्षक अॅक्शन मोडमध्ये; हॉटस्पॉट बनल्याने सर्वच यंत्रणा अलर्टवर

Coronavirus: सावंतवाडी पोलिस निरीक्षक अॅक्शन मोडमध्ये; हॉटस्पॉट बनल्याने सर्वच यंत्रणा अलर्टवर

googlenewsNext

अनंत जाधव 

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रूग्ण वाढत असले तरी सावंतवाडी हा कोरोनाचा हॉटस्पॉट अशी ओळख बनत चालल्याने पोलिस यंत्रणा चांगलीच अर्लटवर आहे.त्यामुळेच स्वता पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे हे इन अॅक्शन दिसत आहेत.स्वता रस्त्यावरून गर्दी नियंत्रणात आणण्यावर भर देत स्वता अनेक वाहान धारक तसेच काम शिवाय फिरणाऱ्या पादचाऱ्यांची चौकशी करत दंड आकारणी बरोबरच कोरोना चाचणी करत असल्याने शहरातील गर्दी मोठ्या प्रमाणात आटोक्यात आल्याचे दिसून येत होते.

सर्वत्र कोरोना काळ सुरू आहे.त्यातच सिंधुदुर्ग जिल्हयात दिवसेदिवस कोरोना रूग्ण वाढत असून,सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोन जाहीर झाल्याने जिल्हावासियांची डोकेदुखी वाढत चालली असतना दुसरी कडे मात्र रूग्ण कमी होण्याचे नाव घेत नाही त्यातच मृत्यू दर ही मोठ्या प्रमाणात आहे.अशातच सावंतवाडी तर कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालल्याचे चित्र आहे.मागील सत्तर दिवसात कोरोना रूग्ण संख्या ही कधीही पन्नासच्या खाली आली नाही याला अपवाद फक्त कालचा शुक्रवार राहिला नाही तर कोरोना रूग्ण वाढत चालले आहेत.त्यामुळे पोलिस महसूल व नगरपालिका यांनी रस्त्यावर उतरून काम करण्याचे ठरवले खरे पण मागील काहि दिवसापासून पोलिस यंत्रणेत थोडी मरगळ आल्याचे दिसून येत होते.त्यामुळे बाजारात पोलिस फिरले तरी त्याचा परिणाम होतना दिसत नव्हता.

मात्र चार दिवसापूर्वी सावंतवाडी प्रभारी पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे हे हजर झाले आहेत.सध्या तरी त्यांच्या कडे प्रभारी पदाचा कार्यभार असला तरी ते पुढील दोन वर्षासाठी कायम असतील असेच दिसून येते.त्यामुळे त्यांनी आपल्या कामाचा आराखडा ही तयार केला असून,सध्या तरी ते इन अॅक्शन अशीच कामगिरी दिसत आहे.त्यांनी पहिल्यादा सावंतवाडी तालुक्यातील कोरोना रूग्ण संख्या कमी करण्या वर भर दिला असून,ते सकाळी सहा वाजताच सहकारी पोलिसांच्या मदतीने शहरात हजर होतात पायी चालत जर कुठे मोठी गर्दी दिसली तर गर्दी बाजूला करणे सोशल डिस्टसिंग बाबत मार्गदर्शन करणे गर्दी न करण्याचे आवाहन करणे अशी कामे करत दिसतात.

पण शासन नियमाप्रमाणे ११ नंतर बाजारात विनाकारण फिरतना आढाळ्यास तसेच दुकाने सुरू ठेवल्यास त्यांची मात्र गय केली जात नाही.दंड आकारणे तसेच कोरोना टेस्ट करणे हे करत असल्याने अनेकांचे धाबे चांगलेच दणाणल्याचे चित्र दिसून येत आहे.त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून सावंतवाडी बाजारपेठेत अकरा नंतर सहसा कोण फिरकत नाही.पोलिस निरिक्षकांसोबत असलेले इतर अधिकारी कर्मचारी ही तेवढीच आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे यातून दिसून येत आहे.त्यामुळे पोलिसांनी इन अॅक्शन काम केले तर सावंतवाडी तालुक्यातील कोरोना रूग्ण संख्या कमी होण्यास ही तेवढीच मदत होणार आहे.असे यातून दिसून येत आहे.

- माझे पहिले ध्येय कोरोन रूग्ण संख्या कमी करणे

मी सावंतवाडी पोलिस निरिक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर माझ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेत आपण बाजारातील गर्दी कशी कमी करू शकतो यावर विचारविनिमय केला तसेच ग्रामीण भाागत ही पोलिसांनी पेट्रोलिग करण्यावर भर दिला तसेच स्वता मी सकाळी शहरात नंतर ग्रामीण भागात जात असल्याने सहकारी ही तेवढ्याच तत्परतेने काम करतात असे पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले.

Web Title: sawantwadi police inspector come in action mode after hotspot of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.