जीवाला जपा, आमदार-खासदारांच्या घरांसमोर आंदोलन करा, प्रकाश आंबेडकरांचं जरांगे पाटलांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 18:37 IST2023-10-30T18:36:32+5:302023-10-30T18:37:01+5:30
Prakash Ambedkar's letter to Manoj Jarange Patils: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामधून प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना स्वत:च्या जीवाला जपण्याचं आवाहन केलं आहे.

जीवाला जपा, आमदार-खासदारांच्या घरांसमोर आंदोलन करा, प्रकाश आंबेडकरांचं जरांगे पाटलांना पत्र
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणाला मराठा समाजातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. तसेच काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही लागल आहे. यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामधून प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना स्वत:च्या जीवाला जपण्याचं आवाहन केलं आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी आमदार-खासदारांच्या घरांसमोर आंदोलन करण्याचा सल्लाही दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जारांगे पाटील यांना लेखी पत्र पाठवून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. या पत्रामधून प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांना स्वतःच्या जीवाला जपण्याचे आवाहन केले आहे. वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सविताताई मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांचे पत्र आज अंतरवली सराटीमध्ये येऊन मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.
या पत्रामधून प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी काही सल्लेही दिले आहेत. त्यामध्ये निवडून आलेल्या आमदार - खासदार यांच्या घरांसमोर आंदोलन करण्याचा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांना दिला आहे. तसेचहे आंदोलन पुढे नेण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी, असं आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.