Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 11:29 IST2025-11-01T11:26:53+5:302025-11-01T11:29:14+5:30

MNS MVA Satyacha Morcha Mumbai Update: पोलिसांनी अद्याप या मोर्चाला परवानगी दिलेली नसली तरी या मोर्चासाठी पुढाकार घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे निघाले आहेत. यासाठी राज यांनी लोकल ट्रेनने प्रवास केला आहे. 

Satyacha morcha Mumbai update: Raj Thackeray arrives by local train; 'Truth March' still not allowed by police | Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही

Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही

मतदार याद्यांमधली घोळ, मतचोरी याविरोधात विरोधक आज मुंबईत सत्याचा मोर्चा काढणार आहेत. यासाठी विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते मोर्चास्थळी जमण्यासाठी सुरुवात झाली आहे. पोलिसांनी अद्याप या मोर्चाला परवानगी दिलेली नसली तरी या मोर्चासाठी पुढाकार घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे निघाले आहेत. यासाठी राज यांनी लोकल ट्रेनने प्रवास केला आहे. 

या मोर्चात काँग्रेस, शरद पवार गट, उद्धवसेना यांच्यासह माकप, भाकप, शेकाप, मनसे आणि इतर संघटना सहभागी होणार आहेत. दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रिटवरून हा मोर्चा सुरू होणार असून मेट्रो सिनेमाच्या समोरून तो महापालिकेच्या प्रवेशद्वारावर येऊन थांबणार आहे. तिथे सभेत रुपांतर होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी मोर्चाच्या निमित्ताने बंदोबस्त वाढविला असून कारवाई केली जाण्याचा इशारा देखील सत्ताधाऱ्यांनी दिला आहे. 

राज ठाकरेंनी दादर ते चर्चगेट लोकलने प्रवास केला. राज ठाकरेंना अचानक लोकल ट्रेनमध्ये पाहून प्रवासी शॉक झाले होते. काही प्रवाशांनी राज यांच्या भोवती गर्दी देखील केली. राज यांनी सर्वांना अभिवादन केले, तसेच एका प्रवाशाला त्याच्याकडील रेल्वेच्या तिकीटावर ऑटोग्राफही दिला. 

कोणाकोणाचा सहभाग ? 

या मोर्चात ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे या प्रमुख नेत्यांसह विरोधी पक्षाचे सर्व प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. मात्र काँग्रेसचे कोण नेते सहभागी होणार याबाबत संभ्रम आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना विचारले असता, पक्षाचे नेते, कार्यकर्ते सहभागी होतील, एवढेच ते म्हणाले.

निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका

राज्य निवडणूक आयोग जोपर्यंत मतदार याद्यांतील गोंधळ व बोगस मतदारांचा घोळ दूर करत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नये यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती उद्धवसेनेच्या नेत्यांनी दिली आहे. सर्वपक्षीय बैठकीत न्यायालयात जाणे, निवडणुकांवर बहिष्कार व निवडणूक आयोगावर सार्वजनिक दबाव आणणे या पर्यायावर चर्चा झाल्याचे मनसे सूत्रांनी सांगितले.

Web Title : राज ठाकरे मुंबई में मतदाता सूची त्रुटियों के खिलाफ 'सत्य मार्च' में शामिल हुए

Web Summary : राज ठाकरे मतदाता सूची त्रुटियों के खिलाफ मुंबई में 'सत्य मार्च' में शामिल होने के लिए लोकल ट्रेन से यात्रा की। विपक्षी दलों द्वारा आयोजित मार्च के लिए पुलिस की अनुमति नहीं है। शरद पवार और उद्धव ठाकरे सहित विभिन्न दलों के नेताओं के भाग लेने की उम्मीद है, जो स्थानीय चुनावों से पहले चुनावी सुधारों की मांग कर रहे हैं।

Web Title : Raj Thackeray Joins 'Truth March' Against Voter List Errors in Mumbai

Web Summary : Raj Thackeray traveled by local train to join the 'Truth March' in Mumbai against voter list errors. The march, organized by opposition parties, lacks police permission. Leaders from various parties including Sharad Pawar and Uddhav Thackeray are expected to participate, demanding electoral reforms before local elections.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.