शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवा, नाहीतर युक्रेनला टॉमहॉक मिसाईल देईन"; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा
2
"माझ्या मुलीला प्रचंड वेदना होताहेत...", वडिलांचा टाहो; पीडितेची प्रकृती गंभीर, मित्रावर संशय
3
सोने-चांदीच्या भावात बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढ; महाराष्ट्रातील सराफा व्यापारी म्हणतात, आणखी वाढणार....
4
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
5
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
6
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
7
राज ठाकरे सहकुटुंब पोहचले मातोश्रीवर; चर्चा राजकीय? निमित्त स्नेहभोजनाचे, तीन महिन्यात दोघांची सातवी भेट 
8
भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय, अपमानाच्या अपराधावर काही गंभीर प्रश्न...
9
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
10
अत्यंत लाजिरवाणी घटना, भारताच्या भूमीत हे घडावे...?
11
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
12
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
13
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
14
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
15
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
16
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
17
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
18
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
19
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
20
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल

नागपूरजवळचे सातनवरी गाव झाले देशातील पहिले स्मार्ट, इंटेलिजंट गाव, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 07:26 IST

Satnavari Village News: आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेतून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवत सातनवरी गाव एक आदर्श मॉडेल ठरले आहे. लवकरच महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातून १० गावे 'स्मार्ट व इंटेलिजंट' करण्यात येणार आहे.

नागपूर - आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेतून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवत सातनवरी गाव एक आदर्श मॉडेल ठरले आहे. लवकरच महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातून १० गावे 'स्मार्ट व इंटेलिजंट' करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास ३,५०० गावांचा कायापालट होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली..

केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या 'व्हॉइस'ने २४ कंपन्यांच्या मदतीने सातनवरी गावात प्रायोगिक तत्त्वावर आधुनिक तंत्रज्ञान आधारित सेवा सुरू केल्या आहेत. या गावाला देशातील पहिले 'स्मार्ट व इंटेलिजंट' गाव म्हणून घोषित करताना मुख्यमंत्री बोलत होते. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंह ठाकूर, सातनवरीच्या सरपंच वैशाली चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यावेळी उपस्थित होते.

असे आहे स्मार्ट सातनवरी गाव...देशातील भारतनेट प्रकल्पाच्या धर्तीवर महाराष्ट्रात महानेट प्रकल्प राबविण्यात आला. याअंतर्गत भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांद्वारे स्मार्ट व इंटेलिजंट गावांची योजना आणण्यात आली. यासाठी सातनवरी या गावाची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली.सातनवरी हे गाव नागपूर शहरापासून अमरावती मार्गावर ३२ किलोमीटरवर आहे. येथे आरोग्य, शिक्षणासोबतच स्मार्ट सिंचन, ड्रोनद्वारे कीटकनाशके व खतफवारणी, बँक ऑन व्हील, स्मार्ट टेहळणी अशा एकूण १८ सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

गावात प्राथमिक शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता व स्मार्ट शिक्षणाचा उपयोग होऊन वैश्विक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल व सातनवरी गाव लवकरच देशात एक रोल मॉडेल म्हणून नावारूपाला येईल.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

गावकऱ्यांना काय फायदे?शेती : आधुनिक साधनांनी माती तपासल्याने शेती अधिक वैज्ञानिक पद्धतीने होईल. ड्रोनने पिकांवर लक्ष, मोबाइलवर हवामान अंदाज, बाजारभावामुळे योग्य वेळी निर्णय घेता येईल.शिक्षण : डिजिटल पुस्तके, AI-सक्षम स्मार्ट क्लासरूम, स्मार्ट अंगणवाडीमुळे शहरी मुलांप्रमाणे शिक्षणाच्या संधी मिळतील.आरोग्य : ई-हेल्थ कार्डद्वारे आरोग्याची डिजिटल नोंद होईल. मोबाइल क्लिनिक, टेलिमेडिसिनमुळे औषधोपचार अधिक परिणामकारक होईल.शासकीय कामकाज : ग्रामपंचायतीतून ऑनलाइन अर्ज. डिजिटल रेशन कार्ड, डेटा डॅशबोर्डमुळे सरकारी योजना वेळेत आणि पारदर्शकपणे मिळतील.दैनंदिन जीवन : स्मार्ट सिंचन, माती सेन्सर, पाणी गुणवत्ता तपासणीमुळे शेतकऱ्यांना पाणी व खतांचा योग्य वापर करता येईल, वेळ, पैसा आणि श्रम वाचतील.

 

टॅग्स :nagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र