शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला; शरद पवारांचे 'खास मित्र' देणार उदयराजेंना टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 10:55 IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चार ऑक्टोबरला साताऱ्यात 

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीमध्ये सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील विरुद्ध माजी खासदार उदयनराजे भोसले असा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने श्रीनिवास पाटील 3 ऑक्टोबराल उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीतर्फे उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू होत्या. परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातून विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतल्याने मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील यांच्या नावाची घोषणा केली.शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना मंगळवारी फोन करून श्रीनिवास पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करा अशी सूचना केली आहे. 3 ऑक्टोबर रोजी पाटील उमेदवारी अर्ज भरणार आहेत. राष्ट्रवादीचे विधानसभेसाठी इच्छुक असलेले सगळे उमेदवार यावेळी उपस्थित राहणार आहेत. पाटील यांनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार मकरंद पाटील वाई विधानसभा मतदारसंघातून, बाळासाहेब पाटील कर्‍हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातून तर सत्यजित पाटणकर पाटण विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.दरम्यान चार ऑक्टोबर रोजी रयत शिक्षण संस्थेमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पवार चार तारखेला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSharad Pawarशरद पवारShrinivas Patilश्रीनिवास पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाsatara-pcसातारा