रायगडमधील सरखेल कान्होजी राजे आंग्रे घराण्याची 300 वर्षांची प्राचीन ज्येष्ठा गौरी पूजनाची परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 18:15 IST2017-08-31T18:13:44+5:302017-08-31T18:15:28+5:30
जयंत धुळप/रायगड, दि. 31 - ज्येष्ठा आणि कनिष्ठ अशा दोन गौरी आहेत. मात्र सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या घराण्यात मात्र ...

रायगडमधील सरखेल कान्होजी राजे आंग्रे घराण्याची 300 वर्षांची प्राचीन ज्येष्ठा गौरी पूजनाची परंपरा
जयंत धुळप/रायगड, दि. 31 - ज्येष्ठा आणि कनिष्ठ अशा दोन गौरी आहेत. मात्र सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या घराण्यात मात्र जेष्ठा गौरींचे आगमन आणि पूजन होत आहे. हे आंग्रे घराण्याची ही 300 वर्षांची परंपरा असून गौरी पूजनाचे वैशिष्ट्य असल्याची माहिती सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या आठव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी 'लोकमत'शी खास बातचित करताना दिली आहे. गेल्या आठ पिढ्यांपासून आंग्रे घराण्याच्या ज्येष्ठा गौरीचा मुखवटादेखील एकच असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या रिती परंपरा पुढील पिढीला समजाव्यात या हेतूने आपण हे सण साजरे करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
{{{{dailymotion_video_id####x845ahf}}}}