Walmik Karad: वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 12:31 IST2025-08-31T12:30:40+5:302025-08-31T12:31:40+5:30
Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज मकोका विशेष न्यायालयाने फेटाळला.

Walmik Karad: वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
बीड: केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज मकोका विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी शनिवारी फेटाळला आहे. या प्रकरणातील आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावर फिर्यादींनी आपले म्हणणे सादर केले नाही. तसेच, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे अनुपस्थित होते आणि आरोपींचे वकील आजारी होते. या तीन प्रमुख कारणांमुळे शनिवारी या प्रकरणाची सुनावणी होऊ शकली नाही.
आता पुढील सुनावणी होणार १० सप्टेंबर रोजी
सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांना सांगितले की, आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ते म्हणाले, आम्ही गेल्या तीन महिन्यांपासून चार्ज फ्रेम (आरोप निश्चिती) होण्याची वाट पाहत आहोत. परंतु, जामीन अर्ज आणि दोषमुक्ती अर्ज दाखल करण्यातच वेळ जात आहे. आता १० सप्टेंबर रोजी तरी या सर्व अर्जांवर निकाल लागून आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू होईल, अशी आमची अपेक्षा आहे. या प्रकरणातील एक महत्त्वाचा दुवा असलेला कृष्णा आंधळे हा अद्यापही बेपत्ता आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी होणार आहे.