शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Sanjay Raut: 'पंजाबमध्ये विजयी होऊन दाखवा...', संजय राऊत यांचे भाजपला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 13:55 IST

Sanjay Raut: उत्तर प्रदेशासह चार राज्यात भाजपने मोठा विजय मिळवला. या निकालावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

मुंबई: काल(10 मार्च) उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपने चार राज्यात मोठा विजय मिळवला. तर, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसचा दारुण पराभव केला. भाजपच्या या विजयानंतर देशभरात भाजप कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आहेत. दरम्यान, या निकालावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

'पंजाबने विजयी होऊन दाखवा...'आज मीडियाशी बोलताना संजय राऊत यांना कालच्या निकालावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर ते म्हणाले की, 'उत्तर प्रदेश आधीपासूनच भाजपचा होता. उत्तराखंड आणि गोव्यातही भाजपची मोठी ताकद होती, म्हणूनच तिथे त्यांना विजय मिळवता आला. पण, पंजाबसारख्या सेंसेटीव्ह राज्यात भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाला विजय मिळवता आला नाही. पंजाबमध्ये विजयी होऊन दाखवा, ' असं राऊत म्हणाले.

'आम्हाला टोले मारता, तुमचं काय?'उत्तर प्रदेश आणि गोवा राज्यात शिवसेनेच्या उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतदान झाले. त्यावरुन राऊतांना प्रश्न विचारण्यात आल्यावर ते म्हणाले की, 'उत्तर प्रदेशात गोव्यात आम्हाला मोठा पाठिंबा नाही, त्यामुळे आम्ही जिंकलो नाही. आमच्या उमेदवाराला कमी मतदान झाल्यामुळे तुम्ही आम्हाला टोला मारता. पण, आमच्यापेक्षा तुमचे वाईट हाल पंजाबमध्ये झाले आहेत.  पंजाबमधील नागरिकांनी तुम्हाला नाकारले, तिकडे तुमच्याही उमेदवारांना विजय मिळवता आला नाही' असंही राऊत म्हणाले.

'मायावती आणि ओवेसींमुळे भाजप विजयी'

भाजपला मोठा विजय मिळाला आहे, पण यूपी त्यांचेच राज्य होते. भाजपच्या विजयात मायावती आणि ओवेसी यांचे योगदान आहे, या सर्वांना पद्मविभूषण आणि भारतरत्न द्यायला पाहिजे. लोक कधी जिंकतात कधी हरतात, तुमच्या आनंदात आम्हीही आहोत. अखिलेश यादव यांच्या जागा वाढल्या, त्यांचेही अभिनंदन, असेही राऊत म्हणाले.

संबंधित बातमी-  'मुंबई महापालिकेवर भगवा फडणार, त्या निवडणुकांचा इथे संबंध नाही'-संजय राऊत

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशgoaगोवाUttarakhandउत्तराखंडPunjabपंजाब