Sanjay Raut News: अजित पवार हे उद्धव ठाकरेंचे विश्वासू आणि निकटचे सहकारी होते. त्यामुळे उद्धव ठाकरे आपल्याशी बोलतील. सुनेत्रा पवारांचा पक्ष महाविकास आघाडीत नाही. तो भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. काँग्रेस जर वेगळा निर्णय घेणार असेल तर त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून लक्ष घातले पाहिजे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
बारामती मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुती प्रयत्नशील असून, याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. यासंदर्भात संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचे भावनिक नाते होते. त्यामुळे ते जे निर्णय घेतील त्याबाबत ते स्वतः बोलतील, असे संजय राऊतांनी सांगितले.
महाराष्ट्रात बारामती पोटनिवडणुकीवर सर्वांचे लक्ष आहे
सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. बारामती पोटनिवडणुकीविषयी ती चर्चा होती. महाराष्ट्रात बारामती पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे. पक्षप्रमुखांशी त्यांनी त्यासंदर्भात केली. ती चर्चा काय झाली, त्यासंदर्भात काय निर्णय आहे, तो लवकरच स्वतः पक्षप्रमुख पत्रकार परिषद घेऊन संवाद साधतील, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.
दरम्यान, काँग्रेस पक्ष चर्चा करत आहे. उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. सगळे निर्णय महाविकास आघाडी म्हणून एकत्र चर्चा झाल्यावर निकाल बाहेर येईल. काँग्रेस देशातील महत्त्वाचा पक्ष आहे. भाजपाबरोबर असलेल्या पक्षाला मदत होऊ नये म्हणून ते निर्णय घेत असतील. पण आम्ही चर्चा करू. बिनविरोध निवडणुकीबाबत सुनेत्रा पवारांनी काँग्रेसबरोबर चर्चा केली का, हे मला माहिती नाही. पण भाजपाने अनेक पोटनिवडणुकांमध्ये उमेदवार दिले आहेत, याची आठवणही संजय राऊतांनी करून दिली.
Web Summary : Sanjay Raut says Thackeray will decide on supporting the Baramati by-election. Sunetra Pawar contacted Thackeray. Congress is discussing, a joint decision expected. Raut reminds BJP has fielded candidates in by-elections before.
Web Summary : संजय राउत ने कहा कि ठाकरे बारामती उपचुनाव का समर्थन करने पर फैसला करेंगे। सुनेत्रा पवार ने ठाकरे से संपर्क किया। कांग्रेस चर्चा कर रही है, संयुक्त निर्णय अपेक्षित है। राउत ने याद दिलाया कि बीजेपी ने पहले भी उपचुनावों में उम्मीदवार उतारे हैं।