शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
4
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
5
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात; ऑटो-FMCG शेअर्समध्ये विक्री
7
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
8
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
9
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
10
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
11
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
12
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
13
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
14
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
15
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
16
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
17
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
18
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
19
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
20
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य

"एकनाथ शिंदेंना तुरुंगात टाकायचा भाजपाचा प्लॅन होता, तेव्हा...", संजय राऊतांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 12:12 IST

Lok Sabha Election : ईडी आणि सीबीआय मागे लावून भाजपाच एकनाथ शिंदे यांना तुरुंगात टाकणार होते, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. 

Sanjay Raut :  मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या चार प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कट महाविकास आघाडी सरकारने आखला होता, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत केला. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ईडी आणि सीबीआय मागे लावून भाजपाच एकनाथ शिंदे यांना तुरुंगात टाकणार होते, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. 

भाजपाने ईडी आणि सीबीआय मागे लावून एकनाथ शिंदे यांनाच जेलमध्ये टाकायचा प्लॅन केला होता. तेव्हा तुरूंगात जायला लागू नये, म्हणून ते कुठे-कुठे जाऊन रडले, हे तुम्ही त्यांना विचारा. भाजपामध्ये गेल्यावर त्या व्यक्तीला खोटं बोलण्याचं ट्रेनिंग दिलं जातं. भाजपामध्ये भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्याला स्थान आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

याचबरोबर, ज्यांनी हिंदुत्व सोडलं, त्यांनी प्रचार गीतात जय भवानी शब्द तरी का आणावा? असा खोचक सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. तुमचं नमो नमो, घर घर मोदी चालतं. ते फडणवीस बोलतात तुम्हाला हिंदुत्वाचा नाव घेण्याचा अधिकार नाही. मगं तुम्हाला आहे का? शिवसेनेचा आणि हिंदुत्वाचा संबंध आहे, त्याच्या आसपासही भाजपा नाही. तुमचं व्यापारी हिंदुत्व आहे, नकली हिंदुत्व आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडले.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचार गीतातून जय भवानी हा शब्द काढायला सांगितल्याने वाद निर्माण झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही बदल करणार नसल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी थेट निवडणूक आयोगालाच आव्हान दिले आहे. यावर संजय राऊत यांनीही भाष्य केले. निवडणूक आयोग ही भाजपाची शाखा आहे. दिल्लीमधील निर्वाचित आयोजित आहे, त्याचं नाव बदलून भाजपा निर्वाचन आयोग करणे गरजेचे आहे. हर हर महादेव या घोषणा देत आहेत, त्याला आतापर्यंत कोणी बंदी आणली नव्हती. काँग्रेसच्या राज्यात सुद्धा जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव याला बंदी नाही आणि नव्हती, असे संजय राऊत म्हणाले.

फडणवीसांसह चार नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा मविआचा 'प्लॅन' होता - मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या राज्यातील चार प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कट महाविकास आघाडी सरकारने आखला होता, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासह गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात खटले उभे करून त्यांना अटक करून तुरुंगात टाकण्याचा कट आखला होता. एवढंच नाही तर २०२४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपाच्या आमदारांना फोडून आपल्याकडे वळवण्याचा डावही आखण्यात आला होता, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४