शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Sanjay Raut: "फडणवीसांचे मन अशांत, यावर त्यांनी एक उपाय करावा...", संजय राऊतांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 11:34 IST

Sanjay Raut: ''मी पुन्हा येईन, असे सांगूनही देवेंद्र फडणवीस सत्तेत आले नाहीत. पुढची 25 वर्षे ते सत्तेत येणार नाहीत."

मुंबई: हनुमान चालिसेवरुन राज्यातील राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान करणाऱ्या राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर भाजपकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जातीये. यातच आता संजय राऊत(Sanjay Raut) यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केलीये. ''देवेंद्र फडणवीस यांचे मन अशांत आहे, त्यांनी हनुमान चालीसा पठण करावी,'' असा सल्ला राऊतांनी दिला आहे.

'हनुमान चालीसा वाचावी'आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, ''मी पुन्हा येईन, असे सांगूनही देवेंद्र फडणवीस सत्तेत आले नाहीत. पुढची 25 वर्षे त्यांची सत्ता येऊ शकणार नाही. त्यामुळेच त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यांचे मन अशांत झाले आहे, अशा अशांत मनावर एकच उपचार आहे, तो म्हणजे फडणवीसांनी आपल्या देवघरात हनुमान चालीसा वाचावी. त्यामुळे फडणवीसांचे मन शांत होईल," असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे. 

'शरद पवार बरोबर बोलले'संजय राऊत यांनी यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांबाबत केलेल्या विधानाचा दाखला देखील दिला. "शरद पवारांनी खूप चांगलं वक्तव्य केलं. सरकार येऊ शकलं नाही म्हणून जी अस्वस्थता निर्माण झाली आहे ती फडणसींच्या लाऊडस्पीकरमधून बाहेर पडत आहे. सत्ता न आल्यानं निर्माण झालेल अस्वस्थता त्यांनी घरात बसून हनुमान चालीसा म्हणून मन शांत करावं", असं संजय राऊत म्हणाले. 

'टोमॅटो सॉस लावून जखमी झाल्याचा दावा'यावेळी संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला. "एक माथेफिरू सध्या ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून जखमी झाल्याचा दावा करत जगभर फिरत असेल तर अशा व्यक्तीच्या मूर्खपणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे", असा खोचक टोला संजय राऊत यांनी सोमय्यांना लगावला आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना