शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Sanjay Raut: 'एकनाथ शिंदे आमचं बोट धरुन अयोध्येला गेले', संजय राऊतांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 18:30 IST

'गद्दारांनी आम्हाला संस्कार, संस्कृती आणि हिंदूत्व शिकवू नये.'

नाशिक: आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाशिकच्या मालेगावमध्ये जाहीर सभा होत आहे. सभेपूर्वी शिवसेना(उबाठा गट) नेते संजय राऊत यांनी सभा स्थळाची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. 

एकनाथ शिंदेंना खोचक टोलायावेळी संजय राऊत म्हणाले की, 'त्यांनी आमचं शिवसेना नाव काढून घेतलं, तरीही ही सभा शिवसेना म्हणूनच होत आहे. आमचा नेता तोच आहे, आम्ही सगळेही इथेच आहोत. येणारी जनताही तीच आहे. मग आमच्याकडून हिरावलं काय? हे त्या लोकांना कळेल.' येत्या 5 एप्रिलला एकनाथ शिंदे अयोध्येला जाणार आहेत. यावर राऊत म्हणाले, 'त्यांना आम्हीच अयोध्या दाखवली. आमचंच बोट धरुन ते अयोध्येला गेले होते.'

फडणवीसांवर टीकाउद्धव ठाकरेंच्या उर्दू भाषेबाबतच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, 'आम्ही नरेंद्र मोदींनाही जनाब नरेंद्र मोदी म्हणतो. या देशात विविधता आहे आणि विविधतेमध्ये एकता आहे. या देशात अनेक जाती, धर्म आणि भाषा आहेत. संविधानाने मान्यता दिलेल्या अनेक भाषा या देशात आहेत. हे भारतीय संविधानाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना विसरू नये. आपली मुलं परदेशी भाषादेखील शिकतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला संस्कार, संस्कृती आणि हिंदूत्व शिकवू नये. बाळासाहेबांना काय उत्तर द्यायचं ते आमचं आम्ही बघू. गद्दारांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNashikनाशिक