Sanjay Raut with Blue Look: संजय राऊतांनी आजच निळा फेटा, निळं उपरणं का घातलं? वाचा काय रंगलीय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 12:58 PM2022-12-17T12:58:23+5:302022-12-17T12:59:57+5:30

मविआच्या महामोर्चाआधी राऊतांचा खास लूक आला चर्चेत

Sanjay Raut Blue Look for Mumbai Morcha gets attention of social media Jai Bhim attire Dr Babasaheb Ambedkar controversy | Sanjay Raut with Blue Look: संजय राऊतांनी आजच निळा फेटा, निळं उपरणं का घातलं? वाचा काय रंगलीय चर्चा

Sanjay Raut with Blue Look: संजय राऊतांनी आजच निळा फेटा, निळं उपरणं का घातलं? वाचा काय रंगलीय चर्चा

googlenewsNext

Sanjay Raut with Blue Look: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि इतर काही नेतेमंडळी यांच्याकडून गेल्या काही दिवसांमध्ये विधाने केली गेली, ज्यामुळे वाद निर्माण झाला. भाजपाच्या नेत्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने केला जाणारा महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न अशा विविध मुद्यांवरुन महाविकास आघाडीतर्फे महामोर्चा (Maha Morcha) काढण्यात आला आहे. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर समविचारी पक्षासह इतर संघटना या महामोर्चात सहभागी झाले आहेत. इतकेच नव्हे तर उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही मोर्च्यात चालताना दिसल्या आहेत. पण या सर्व बाबींमध्ये एक बाब प्रामुख्याने लक्ष वेधून गेली, ती म्हणजे संजय राऊत यांचा निळा फेटा आणि निळे उपरणे.

संजय राऊत हे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेत आहेत आणि ते आजही उद्धव ठाकरे गटाशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळेच त्यांना जेव्हा पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटक झाली होती त्यावेळी भावनिक आव्हान करताना त्यांनी भगवं उपरणं गळ्याभोवती गुंडाळलं होतं. मग आज अचानक निळा फेटा आणि निळं उपरणं का, असा सवाल अनेकांना पडला आहे. यामागचं कारण थेट त्यांनी सांगितलं नसलं तरी राऊतांच्या या लूकची चर्चा आहे. महाविकास आघाडीच्या महा मोर्चाआधी काही आंबेडकरी कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा दिल्या. यावेळी संजय राऊत यांनी निळा फेटा आणि निळं उपरणं घातलं.

डॉ. आंबेडकरांबद्दलच्या वक्तव्यावरून झाला होता वाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचे विधान संजय राऊत यांनी केले होते. या विधानावरून भाजपने संजय राऊत आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटावर सडकून टीका केली होती. भाजपा नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत राऊतांवर तोड डागली आणि त्यांच्याविरोधात आज मुंबईत माफी आंदोलन करण्याची घोषणा केली. या साऱ्या पडसादानंतर डॉ. आंबेडकर यांच्या अनुयायांची मनं जिंकण्यासाठी राऊत यांनी हा नवा लूक घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळातसह सोशल मीडियावर दिसून आली आहे.

निळा फेटा, उपरणं घालून राऊत काय म्हणाले?

"छत्रपती शिवरायांचा अपमान झाल्यावर 'महाराष्ट्र बंद' करायला हवा होता. पण तसं काहीच दिसलं नाही. आम्ही तो बंद पुढे ढकलला आहे, पुढे पाहू. पण सध्या माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की त्यांनी हा बंद मागे घ्यावा आणि हा बंद मागे घेऊन आमच्या मोर्चात सामील व्हावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा व्यक्ती राजभवनात बसला आहे. यांचा मेंदू दिल्लीत गहाण ठेवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं बेताल वक्तव्य आजपर्यंत कोणी केलं नव्हतं. आम्हाला अभिमान आहे की महाराष्ट्रप्रेम म्हणून हे काम आम्ही हाती घेतले आहे आणि तुम्ही मिंधे आहात म्हणून तुम्ही हे सहन करत आहात. तुम्ही फक्त खोकी मोजत बसा," असा टोला राऊतांनी लगावला.

 

Web Title: Sanjay Raut Blue Look for Mumbai Morcha gets attention of social media Jai Bhim attire Dr Babasaheb Ambedkar controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.