शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

संजय पांडे यांची महासंचालक पदी बढती, गुरुवारी स्वीकारणार पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 03:36 IST

राज्य सरकारच्या अन्यायाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागून सेवा ज्येष्ठता मिळविलेल्या ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांची अखेर महासंचालकपदी बढती करण्यात आली आहे. त्यांना सध्या कार्यरत असलेल्या होमगार्डचे महासमादेशक बनविण्यात आले आहे.

जमीर काझी मुंबई : राज्य सरकारच्या अन्यायाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागून सेवा ज्येष्ठता मिळविलेल्या ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांची अखेर महासंचालकपदी बढती करण्यात आली आहे. त्यांना सध्या कार्यरत असलेल्या होमगार्डचे महासमादेशक बनविण्यात आले आहे. ‘एफएसल’चे महासंचालक एस. पी. यादव यांच्यानंतर पोलीस दलातील ते ज्येष्ठ अधिकारी असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबतच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्यानंतर गृहविभागाच्या वतीने बुधवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले. ते गुरुवारी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.संजय पांडे यांची सेवाज्येष्ठता दोन वर्षे ८ महिन्यांनी डावलणे चुकीचे असून, नियमानुसार त्यांचे प्रमोशन करा, असे आदेश उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश विजया ताहिलरमानी व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने ७ डिसेंबरला दिले होते. गेल्या वर्षी राज्य सरकारने त्यांनी १४ वर्षांपूर्वी घेतलेली रजा असाधारण ठरवत अप्पर महासंचालकपदी २०१२ऐवजी आॅक्टोबर २०१४ची पदोन्नती दिली.पांडे हे १९८६च्या आयपीएस तुकडीतील अधिकारी असून, ते ३० जून २०२२मध्ये सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे जवळपास पाच वर्षे इतक्या दीर्घ कालावधीत महासंचालकपदावर राहाणाºया काही मोजक्या अधिकाºयांमध्ये त्यांचा समावेश होईल. २००० साली उपायुक्त म्हणून कार्यरत असताना तत्कालीन राज्यकर्त्यांशी मतभेद झाल्याने पांडे यांनी राजीनामा देऊन परदेशात खासगी नोकरी पत्करली होती. मात्र, सरकारने राजीनामा मंजूर न केल्याने ते २ वर्षे ८ महिन्यांनी पुन्हा त्या खात्यात रुजू झाले.कोर्टाने त्यांना पूर्वीचीच ‘सेवाज्येष्ठता’ देण्याचे आदेश दिले होते. मात्र, आॅक्टोबर २०१६मध्ये राज्य सरकारने त्याबाबतचा निर्णय बदलून राजीनामा कालावधी असाधारण रजा ठरविली होती. पांडे यांनी त्याला न्यायालयात आव्हान दिल्यानंतर कोर्टाने सरकारच्या पक्षपाती निर्णयाबद्दल कडक ताशेरे ओढले. त्यामुळे सरकारने आता त्यांना महासंचालकपदी बढती दिली आहे.कोण आहेत संजय पांडे?‘आयआयटी’तून पदवीधर झालेले पांडे हे प्रामाणिक व भ्रष्टाचाराविरुद्व कोणाच्याही दबावाला न जुमानता लढणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. वांद्रे येथे उपायुक्त म्हणून कार्यरत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याचे ज्येष्ठ पुत्र जयदेव ठाकरे यांच्या विरुद्धच्या तक्रारीबद्दल त्यांना अटक करण्यासाठी मातोश्री बंगल्यावर त्यांनी छापा टाकला होता. ३ वर्षांपूर्वी ‘वेट्स अ‍ॅण्ड मेजरमेंट’मध्ये नियंत्रक म्हणून कार्यरत असताना शासन व ग्राहकांची फसवणूक करणाºया व्यापारी, उद्योगपती व बिल्डरविरुद्ध कारवाई करीत शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळवून दिला होता.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliceपोलिस