संजय दत्त यांना भाजपात प्रवेश नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 04:31 IST2018-07-18T04:30:51+5:302018-07-18T04:31:36+5:30

नाणार प्रकल्पाच्या मुद्यावर विधानपरिषदेत चर्चा सुरू असताना काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी एका वृत्तपत्रातील बातमीचे कात्रण दाखवत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

 Sanjay Dutt does not have access to BJP | संजय दत्त यांना भाजपात प्रवेश नाही

संजय दत्त यांना भाजपात प्रवेश नाही

नागपूर : नाणार प्रकल्पाच्या मुद्यावर विधानपरिषदेत चर्चा सुरू असताना काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी एका वृत्तपत्रातील बातमीचे कात्रण दाखवत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वृत्तपत्रातील बातमीवर विश्वास ठेवू नका, एका दिवशी संजय दत्त भाजपात आल्याचीही बातमी येईल. यावर संजय दत्त म्हणाले, मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये आले तर त्यांचे स्वागतच आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले, संजय दत्त भाजपात येणार असे म्हणालेलो नाही, तर वृत्तपत्रातील बातमीचे सांगत आहे. तसेच भाजपात आधीच गर्दी झाली आहे.

Web Title:  Sanjay Dutt does not have access to BJP