Sangram Jagtap from the nagar; Sanjay Shinde from madha | नगरमधून संग्राम जगताप; माढ्यातून संजय शिंदे, राष्ट्रवादीचा नवा डाव 

नगरमधून संग्राम जगताप; माढ्यातून संजय शिंदे, राष्ट्रवादीचा नवा डाव 

- अतुल कुलकर्णी 
मुंबई  - अहमदनगर मतदारसंघातून आमदार संग्राम अरुण जगताप, तर माढ्यातून आ. बबन शिंदे यांचे बंधू संजयमामा शिंदे यांना उमेदवारी देऊन अनुक्रमे सुजय विखे व रणजितसिंह मोहिते-पाटील यांची कोंडी करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा  आहे. अमरावतीतून नवनीतकौर राणा यांना उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीनेसहमती दर्शवल्याची माहिती आहे.

मात्र, नवनीत कौर राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभ्या राहणार की, राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार, याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही, असे
प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सांगितले. नवनीत कौर राणा लढण्यास इच्छुक असून त्यांनी पती रवी राणा यांच्यासह राष्ट्रवादीचे
अध्यक्ष शरद पवार आणि खा. प्रफुल्ल पटेल यांची बुधवारी भेट घेतली. मात्र अमरावतीबाबत दोन्ही काँग्रेसमध्ये एकमत झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे त्यांना सांगण्यात आले.

राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांनीही पवारांची भेट घेत भूमिका स्पष्ट केली. अनिल गोटे-शरद पवार भेट तब्बल २६ वर्षानंतर आ. अनिल गोटे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. तेलगी प्रकरणानंतर गोटे पवारांपासून दुरावले होते. कोणत्याही परिस्थितीत मला केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांना पराभूत करायचे आहे म्हणून मी पवारांची भेट घेतली, असे नंतर गोटे यांनी सांगितले. भामरेंच्या विरोधात स्वत: गोटे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.

राज ठाकरेंच्या भेटीचे राज
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चचलर््े ाा उधाण आले होते. मनसे लोकसभा निवडणूक
लढविणार नसली, तरी राज ठाकरे भाजपाविरोधात प्रचार करणार आहेत. राज यांच्या सभांच्या नियोजनासाठीच ही भेट असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Sangram Jagtap from the nagar; Sanjay Shinde from madha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.