शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीची जागा आम्हीच लढणार, दौऱ्यापूर्वी संजय राऊत यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 09:38 IST

Lok Sabha Elections 2024 : सांगलीची जागा आम्हीच लढणार असल्याचे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबई :  गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्ष सांगली लोकसभेची जागा लढवत आला आहे. परंतु, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा सांगितला आणि या जागेवर आपला उमेदवारही जाहीर केला. मात्र, या जागेवरील आपला हक्क सिद्ध करून ही जागा ठाकरे गटाकडून परत मिळवण्यासाठी काँग्रेसच्या जिल्हा आणि प्रदेश पातळीवरील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, सांगलीची जागा आम्हीच लढणार असल्याचे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत हे आजपासून 3 दिवस सांगली दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातील सर्व 48 जागा महाविकास आघाडीच्या आहेत. त्यामुळे त्या फक्त शिवसेना (ठाकरे गट) किंवा काँग्रेसच्या नाहीत. शिवसेनेचे सर्व जागा जिंकण्याचे स्पष्ट व्हिजन आहे, असे संजय राऊत म्हणाले. तसेच, सांगलीची जागा शिवसेनेकडे असल्याने काही लोकांमध्ये नाराजी असू शकते. अमरावती आणि कोल्हापूर आमच्या जागा होत्या, पण आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना समजावले आहे. त्यामुळे सांगलीत काँग्रेसचे काही लोक नाराज असतील, तर त्यांना समजावून सांगण्याची जबाबदारी काँग्रेसच्या वरिष्ट नेतृत्वाची आहे. तसेच, सांगलीची जागा जिंकण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असे संजय राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर आपला उमेदवारही जाहीर केला. या जागेवर ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गटाने कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडली आहे. त्याबदल्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाने सांगली लोकसभेची जागा आपल्याकडे घेतली आहे. कोल्हापूरात काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. परंतु, सांगलीच्या जागेसाठी स्थानिक काँग्रेस नेते तसेच राज्य पातळीवरील काही नेते या निर्णयाच्या विरोधात आहेत. त्यामुळे या जागेबाबत अद्यात तिढा कायम असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSangliसांगलीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४