शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजप, काँग्रेसमधल्या बंडखोरीने अधिकृत उमेदवरांच्या अडचणी वाढल्या; वाद मिटवण्यासाठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 20:44 IST

सांगलीत काँग्रेस आणि भाजपमधील बंडखोरीमुळे अधिकृत उमेदवारांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपल्यावर महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर समोर आला आहे. मात्र उमेदवारी न मिळाल्याने किंवा आयत्या वेळी पक्षात प्रवेश केलेल्या उमेदवारी मिळाल्याने निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये नाराजी पसरली आहे. याच नाराजीतून अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पण आता या बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवरांचा फटका पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना बसणार आहे. सांगली जिल्ह्यातही असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे.

लोकसभेला झालेल्या सांगली पॅटर्नची पुन्हा एकदा जिल्ह्यात पुनरावृत्ती होताना दिसत आहे. सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघामधील प्रमुख पक्षांच्या लढतीचे चित्र स्पष्ट झालय. मात्र असे  असले तरी पाच मतदारसंघात अधिकृत उमेदवारांची बंडखोर उमेदवारांमुळे चांगलीच कोंडी झालीय. बंडखोरीचा सर्वाधिक फटका भाजप आणि काँग्रेसला बसणार आहे. भाजपला शिराळा, जत व सांगली या तीन मतदारसंघात, तर काँग्रेसला सांगलीत बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीत सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी निवडणूक जिंकून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. विधानसभेलाही असाच निकाल लागेल या अपेक्षेने बंडखोरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सांगली विधानसभा निवडणुकीसाठी जयश्री पाटील या काँग्रेसकडून इच्छुक असतानाही त्यांना डावलून पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. तर मिरजची जागा ठाकरे गटाला मिळाली असताना काँग्रेसचे मोहन व्हनखंडे याठिकाणी अर्ज दाखल केला.

दुसरीकडे, खानापूर मतदारसंघाची जागा शिंदे गटाला सुटली असली तरी या मतदारसंघातून भाजपचे ब्रह्मानंद पडळकर बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. शिराळ्यात सम्राट महाडिक यांनी तर जतमध्ये तम्मनगौडा रवी यांनी भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष लढण्याचं ठरवलं आहे. यामुळे भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या सगळ्यात पक्षाच्या अधिकृत उमेदवारासमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे अधिकृत उमेदवारांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे वाद मिटविण्याची मागणी केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर असल्याने उमेदवारांकडून बंडखोरांचे बंड शमविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sangliसांगलीcongressकाँग्रेसBJPभाजपा