शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
3
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
4
"पुरस्कार घेण्यास परदेशात गेलीस तर…’’, नोबेल विजेत्या महिलेला सरकारने दिली धमकी  
5
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! २४ तासांत १७ लाख कोटींची फोडणी, क्रिप्टो मार्केट आपटलं; Bitcoin ७% पेक्षा अधिक घसरलं
6
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
7
ST महामंडळाचा आर्थिक शिस्तीवर भर; नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, पारदर्शकतेसाठी विशेष नोंदवही
8
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
9
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
10
IND vs SA 2nd Test Pitch Report: गुवाहाटीत ‘मुंबई पॅटर्न’? पिच ‘कोणाला’ देणार साथ?
11
Health Crisis: कितीही अँटिबायोटिक खाल्ले तरीही होईना काही परिणाम; जीवाणूंची शक्ती वाढली, आरोग्य धोक्यात!
12
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
13
एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
14
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
15
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
16
JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते 
17
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
18
Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
19
BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
20
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 14:19 IST

ताडोबाच्या जंगलातून सह्याद्री प्रकल्पात आणलेल्या वाघिणीला नियंत्रित पिंजऱ्यातून मुक्त करण्यात आले. तिला चांदोली जंगलात सोडण्यात आले आहे.

आनंदा सुतार लोकमत न्यूज नेटवर्कवारणावती (जि. सांगली): ताडोबाच्या जंगलातून सह्याद्री प्रकल्पात आणलेल्या वाघिणीला नियंत्रित पिंजऱ्यातून मुक्त करण्यात आले. तिला चांदोली जंगलात सोडण्यात आले आहे. वनविभाग तिच्या हालचालींवर नजर ठेवून आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढविण्यासाठी हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी उपक्रमातील पहिला टप्पा यामुळे यशस्वी झाला आहे. ताडोबातून आणलेल्या तारा वाघिणीला १८ नोव्हेंबरपर्यंत चांदोली परिसरात नियंत्रित पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. 

तोऱ्यात पाऊल ठेवले जंगलात

तारा ही नवी ओळख मिळालेल्या या वाघिणीला पिंजऱ्यातच शिकार देण्यात आली. त्यामुळे ती तेथेच रमली. १८ नोव्हेंबर रोजी नियंत्रित पिंजरा खुला करण्यात आला, तरी खाद्य मिळत असल्याने ती दोन दिवस बाहेर पडलीच नाही, आतच फिरत राहिली. सकाळी ८ वाजता तिने डौलदार पावले टाकत पिंजऱ्यातून जंगलात प्रवेश केला.

'तारा वाघिणीने चांदोलीमध्ये उत्कृष्ट क्षमता दाखविली आहे. ती जंगलातील स्वावलंबी जीवनासाठी पूर्णपणे सिद्ध आहे, असे स्पष्ट झाले आहे. व्याघ्र पुनर्स्थापन प्रकल्पातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. 'तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प'वाघीण नैसर्गिक परिस्थितीशी पूर्ण सुसंगत वर्तन करत आहे. तिच्यामुळे सह्याद्री व्याघ्र संवर्धनाला नवी गती मिळणार आहे.'- एम. एस. रेड्डी, प्रधान मुख्य वन्यजीव रक्षक

English
हिंदी सारांश
Web Title : New chapter in Sahyadri Tiger Reserve: 'Tara' released into the wild.

Web Summary : Tadoba's tigress 'Tara' was released into Chandoli forest, marking a successful step in increasing the tiger population in Sahyadri. Fitted with a radio collar, her movements are closely monitored by the forest department. She adapted well, demonstrating self-sufficiency for independent life in the wild.
टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्र