शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 07:03 IST

Samruddhi Mahamarg latest news: शेवटच्या टप्प्यातील मार्ग; 'एमएसआरडीसी'च्या कामावर टीका

मुंबई/कसारा/इगतपुरी : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या आमने ते इगतपुरी या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन होऊन १९ दिवस होत नाही तोच या मार्गावर खड्डे पडले आहेत. ७६ किमी लांबीच्या या मार्गासाठी २,८०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. आमने येथून पुढे ३१ किलोमीटरवर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे राज्य महामंडळाच्या रस्ते विकास (एमएसआरडीसी) कामावर टीका होत आहे. (samruddhi mahamarg latest news in marathi)

मुंबई ते नागपूर जलद प्रवासासाठी 'एमएसआरडीसी'ने ७०१ किमी लांबीच्या महामार्गाची उभारणी केली आहे. त्यासाठी ६१ हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे. त्यातील आमने ते इगतपुरी या ७६ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ५ जूनला लोकार्पण झाले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. शेवटच्या टप्प्याच्या महामार्गावर अनेक त्रुटी आहेत. २० दिवसांत ११ अपघात झाले आहेत. अनेक वाहने नादुरुस्त होत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.

सतत पावसाचा फटका

नवयुगा इंजिनिअरिंग कंपनीने हे काम केले आहे. या मार्गावर उभारलेल्या अंडरपासवर उभारलेल्या रस्त्यावर हे खड्डे पडले आहेत. मात्र, काँक्रीटच्या रस्त्याला कोणतीही हानी झाली नाही.

काँक्रीटच्या अंडरपासवर डांबरीकरण केले आहे. येथे सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे डांबरावर एका ठिकाणी छोटे खड्डे पडले आहेत. मात्र, पुलाच्या स्ट्रक्चरला कोणतीही हानी झाली नाही. आता खड्डे भरण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

यापूर्वी पुलावर भेगा, पॅनल कोसळले

समृद्धी महामार्ग वाहतुकीला खुला करण्यापूर्वी एप्रिलमध्ये या ७६ किमी लांबीच्या मार्गाच्या २४ पॅनलला काही भेगा आढळल्या होत्या. त्यावेळीही 'एमएसआरडीसी'वर टीका झाली होती, तसेच काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरजवळ पुलावरील पॅनल कोसळल्याचे समोर आले होते.

गेल्यावर्षी जुलैमध्ये 'समृद्धी'वर छत्रपती संभाजीनगरजवळ ४० मीटर अंतरावर सिमेंटच्या रस्त्याला भेगा पडल्या होत्या. परिणामी या मार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गhighwayमहामार्गPotholeखड्डे