समृद्धीवर वाशिम, बुलढाणा जिल्ह्यात ‘ब्लॉक’, ७ ते २३ फेब्रुवारीदरम्यान विविध टप्प्यांत काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 15:46 IST2026-02-05T15:45:45+5:302026-02-05T15:46:59+5:30
समृद्धी महामार्गावर ‘हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ अंतर्गत गॅन्ट्री बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे ७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहेत.

समृद्धीवर वाशिम, बुलढाणा जिल्ह्यात ‘ब्लॉक’, ७ ते २३ फेब्रुवारीदरम्यान विविध टप्प्यांत काम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: समृद्धी महामार्गावर ‘’हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’’ (आयटीएमएस) अंतर्गत गॅन्ट्री बसविण्याचे काम आता वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी ७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत एकूण ३५ टप्प्यांत वाहतूक ब्लॉक घेतले जाणार आहेत. या काळात महामार्गावरील संबंधित वाहिनीवरील वाहतूक दररोज ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णतः थांबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्गावर आयटीएमएस यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड), मंगरूळपीर, मालेगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून जाणाऱ्या १७८.९०० ते २९०.४०० किलोमीटरदरम्यान ही गॅन्ट्री उभारली जाणार आहे.
समृद्धी महामार्ग: गॅन्ट्री उभारणी कामाचे वेळापत्रक
| तारीख | ठिकाण (साखळी किमी) | वाहिनी (बाजू) | वेळ |
| ७ फेब्रुवारी | १७८.९०० व १७९.७५० | मुंबई वाहिनी | दुपारी ३ ते ४ |
| ७ फेब्रुवारी | १७९.७५० | नागपूर वाहिनी | दुपारी १२ ते १ |
| ८ फेब्रुवारी | २८४.१०० व २९०.४०० | नागपूर वाहिनी | दुपारी ३ ते ४ |
| ८ फेब्रुवारी | २९०.४०० | मुंबई वाहिनी | दुपारी १२ ते १ |
| ९ फेब्रुवारी | १८३.७०० व १८५.५०० | नागपूर वाहिनी | दुपारी १२ ते १ |
| ९ फेब्रुवारी | १८५.५०० | मुंबई वाहिनी | दुपारी ३ ते ४ |
| १० फेब्रुवारी | १९०.४०० | दोन्ही वाहिन्या (नागपूर व मुंबई) | नागपूर: दु. १२-१, मुंबई: दु. ३-४ |
| १२ फेब्रुवारी | २०५.४०० | दोन्ही वाहिन्या (नागपूर व मुंबई) | नागपूर: दु. १२-१, मुंबई: दु. ३-४ |
| १४ फेब्रुवारी | २०८.८५० | दोन्ही वाहिन्या (नागपूर व मुंबई) | नागपूर: दु. १२-१, मुंबई: दु. ३-४ |
| १८ फेब्रुवारी | २५०.५०० | दोन्ही वाहिन्या (नागपूर व मुंबई) | नागपूर: दु. १२-१, मुंबई: दु. ३-४ |
| २३ फेब्रुवारी | २८३.९०० | दोन्ही वाहिन्या (नागपूर व मुंबई) | नागपूर: दु. १२-१, मुंबई: दु. ३-४ |
प्रवाशांना आवाहन
गॅन्ट्री उभारणीच्या कामामुळे प्रवाशांचा खोळंबा होऊ नये, यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी हे वेळापत्रक पाहून त्यानुसार नियोजन करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
अधिकारी काय म्हणाले?
या महामार्गावर भरधाव वेगाने वाहने धावत असल्याने कामादरम्यान कोणताही अपघात घडू नये यासाठी महामार्गावरील काम सुरू असलेल्या बाजूची वाहतूक काही काळासाठी बंद केली जाणार आहे. काम पूर्ण होताच वाहतूक पुन्हा पूर्ववत केली जाईल, असे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.