शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

समीर भुजबळ यांची एसीबीकडून चौकशी

By admin | Updated: February 21, 2015 03:12 IST

छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्र सदन आणि अन्य काही कामांचे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देण्याच्या मोबदल्यात भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित कंपन्यांना आर्थिक लाभ मिळाला,

आज पंकज भुजबळ यांचा नंबर? : तीन तासांनंतर नोंदवला जबाबमुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्र सदन आणि अन्य काही कामांचे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देण्याच्या मोबदल्यात भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित कंपन्यांना आर्थिक लाभ मिळाला, या आरोपातील तथ्य पडताळण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारपासून उघड चौकशी सुरू केली. पहिल्याच दिवशी भुजबळ यांचे पुतणे समीर यांची वरळीच्या एसीबी मुख्यालयात तीन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांचा जबाबही नोंदविण्यात आला. उद्या, भुजबळ यांचे पूत्र पंकज यांची चौकशी होणार असल्याचे समजते.भुजबळ कुटुंबियांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांनी जमविलेल्या बेहिशेबी मालमत्तेची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी गेल्यावर्षी आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया व इतरांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्यानुसार १८ डिसेंबरला मुख्य न्यायाधीश न्या. मोहित शहा, न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने भुजबळ कुटुंबियांविरोधात झालेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश एसीबी व अंमलबजावणी संचालनालयास (ईडी) दिले होते. या यंत्रणांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून, चौकशीचा अहवाल २८ फेब्रुवारीपर्यंत सादर करावा, असेही खंडपीठाने निर्देशीत केले होते. दरम्यानच्या काळात राज्य सरकारनेही एसीबीला या प्रकरणी उघड चौकशी करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार शुक्रवारपासून एसीबीने चौकशीला सुरूवात केली. भुजबळ यांचे पुतणे व माजी खासदार समीर यांना चौकशीसाठी बोलावले होते. अकराच्या सुमारास समीर वरळी येथील एसीबीच्या मुख्यालयात पोहोचले. तेथून ते साडेतीनच्या सुमारास बाहेर पडले. समीर यांनी आरोपांबाबत प्राथमिक माहिती दिली आहे. त्यांचा जबाब पुढे सुरू राहील. त्यासाठी सोमवारी त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)मीडिया ट्रायल नको !च्महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रश्नी माजी खासदार समीर भुजबळ यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने चौकशी केली असली तरी, अशा चौकशीतून ते सहीसलामत बाहेर पडतील. च्गेल्या काही काळापासून राजकीय हेतूने प्रेरित होऊन भुजबळ कुटुंबीयांना विविध कारणास्तव ‘टार्गेट’ केले जात आहे. त्यातून साध्य काहीच होत नाही, मात्र मीडियानेही अशा प्रश्नांवर ‘ट्रायल’ घेऊ नये, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.