शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

याकूब मेमन प्रमाणेच एकबोटे आणि भिडेंवर गुन्हे दाखल करा- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 14:39 IST

भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराला कारणीभूत असणाऱ्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना याकुब मेननचाच न्याय लावावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली

मुंबई- भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराला कारणीभूत असणाऱ्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना याकुब मेननचाच न्याय लावावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. याकूब मेमन प्रत्यक्ष बॉम्बस्फोटात सहभागी नव्हता, पण त्याने त्यासाठी पूर्ण मदत केली. तसाच प्रकार भिडे आणि एकबोटेंनी केला आहे. त्यांचं कृत्यही दहशतवादाप्रमाणेच आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.  बुधवारी महाराष्ट्र बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आजच्या बंदमध्ये इच्छेने सहभागी व्हा, कोणावरही जबरदस्ती करु नये. आंदोलकांनी संयम ठेवा, जबरदस्ती नको, शांततेने बंद पाळला जावा, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांना केलं.

आपल्या देशात प्रत्येकाला कोणता देव किंवा धर्म मानायाचा याचं स्वातंत्र्य आहे. मात्र, सध्या काही लोक त्यांचा देव किंवा धर्म दुसऱ्यांवर लादू पाहत आहेत. भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्यानिमित्ताने त्याचा प्रत्यय आला. त्यामुळेच आम्ही ही सक्ती झुगारत आहोत, हे दाखवून देण्यासाठी आजचा संघटित बंद पुकारण्यात आल्याचे आंबेडकर यांनी सांगितलं. तसेच सरकारने भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या चौकशीसाठी दलित समाजाचा न्यायाधीश नेमू नये. तसं केल्यास ते सवर्णांवर अविश्वास दाखवल्यासारखे होईल. शासनाला याबाबत निर्णय घेता येत नसल्यास त्यांनी आम्हाला सांगावे. आम्ही त्यांना नाव सुचवू, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, त्याचं स्वागत आहे. पण या चौकशी समितीच्या अध्यक्षस्थानी दलित न्यायाधीश नको. त्यामुळे सवर्णांवर अन्यायाची भावना होईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदBhima-koregaonभीमा-कोरेगावPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर