शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

आरकेंच्या कर्तृत्वाला सलाम

By admin | Updated: November 7, 2014 04:04 IST

स्वाक्षरी घेण्यासाठी लहान मुलांची उडालेली झुंबड... पुष्पगुच्छांचा वर्षाव... चॉकलेटचे ‘गिफ्ट्स’... आणि मान्यवरांनी अविस्मरणीय आठवणींना दिलेला

पुणे : स्वाक्षरी घेण्यासाठी लहान मुलांची उडालेली झुंबड... पुष्पगुच्छांचा वर्षाव... चॉकलेटचे ‘गिफ्ट्स’... आणि मान्यवरांनी अविस्मरणीय आठवणींना दिलेला उजाळा... अशा उल्हासित वातावरणात एका ‘कॉमन मॅन’ला नायक बनविणाऱ्या जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांचा ९४वा वाढदिवस औंध येथील त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.गेली ५० वर्षे आपल्या कुंचल्यातून राजकीय, सामाजिक परिस्थितीवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून भाष्य करीत वाचकांना आनंदाची पर्वणी देणाऱ्या आर.के. लक्ष्मण यांनी २४ आॅक्टोबरला ९५व्या वर्षात पदार्पण केले. त्याचे औचित्य साधून त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यासाठी सरस्वती लायब्ररी, साहित्यवेध प्रतिष्ठान आणि आर.के.प्रेमी मंडळींच्या वतीने त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आर.के. लक्ष्मण यांची पत्नी कमला यांच्यासह एमआयटीचे संस्थापक-अध्यक्ष विश्वनाथ कराड, कॉसमॉस बँंकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, ‘लोकमत’चे मुख्य संपादक विजय कुवळेकर, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष सुनील महाजन यांच्या उपस्थितीत केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. एक माणूस म्हणून त्यांच्यात खूप चांगल्या गोष्टी पाहायला मिळतात, असे विजय कुवळेकर म्हणाले. या वेळी प्रा. विश्वनाथ कराड, कृष्णकांत गोयल, सुधीर गाडगीळ यांनीही मनोगत व्यक्त केले. तर आर.के. लक्ष्मण यांच्या कामाची जाण ठेवून त्यांच्या वाढदिवसादिनी प्रेमाचा जो वर्षाव झाला त्याबद्दल मी मनापासून ऋणी आहे, अशा भावना कमला लक्ष्मण यांनी व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)