सलमानच्या खटल्यावर 16 जूनर्पयत स्थगिती
By Admin | Updated: June 3, 2014 01:51 IST2014-06-03T01:51:04+5:302014-06-03T01:51:04+5:30
अभिनेता सलमान खानच्या हिट अॅण्ड रन प्रकरणावर कार्यक्रम सादर न करण्याची खाजगी वृत्त वाहिन्यांवर घातलेली बंदी उच्च न्यायालयाने 16 जूनर्पयत वाढवली आह़े

सलमानच्या खटल्यावर 16 जूनर्पयत स्थगिती
>हिट अॅण्ड रन प्रकरण
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या हिट अॅण्ड रन प्रकरणावर कार्यक्रम सादर न करण्याची खाजगी वृत्त वाहिन्यांवर घातलेली बंदी उच्च न्यायालयाने 16 जूनर्पयत वाढवली आह़े सोमवारी सुटीकालीन न्या़ एस़ सी़ गुप्ते यांच्यासमोर यावर सुनावणी झाली़ त्यात वरील तारखेर्पयत वृत्त वाहिन्यांवरील बंदी कायम करीत न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली़
सलमानने 12 वर्षापूर्वी वांद्रे येथे भरधाव गाडी चालवत चौघांना चिरडल़े यात एकाचा बळी गेला़ याप्रकरणी सलमानविरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू आह़े काही वृत्त वाहिन्यांनी या संपूर्ण घटनेवर कार्यक्रम सादर केल़े
यावर आक्षेप घेत सलमानने वृत्त वाहिन्यांविरोधात दावा दाखल केला़ तसेच अशा कार्यक्रमांवर बंदी आणण्यासाठी स्वतंत्र अजर्ही केला़ त्याची दखल घेत न्यायालयाने 3क् मे रोजी वृत्त वाहिन्यांना हिट अॅण्ड रनप्रकरणी कार्यक्रम सादर करण्यास मनाई केली़ (प्रतिनिधी)