शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

Maratha Reservation Kolhapur : भरपावसात कोल्हापूरात सकल मराठा क्रांती मूक मोर्चा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 11:35 AM

Maratha Reservation Kolhapur: आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला आज बुधवारी भरपावसात कोल्हापुरातील ऐतिहासिक नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी सुरुवात झाली.

ठळक मुद्दे प्रकाश आंबेडकर, सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांची उपस्थितीराज्यभरातील मराठा समाजातील समन्वयकांसह राजघराणे सहभागी

कोल्हापूर : आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला आज बुधवारी भरपावसात कोल्हापुरातील ऐतिहासिक नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी सुरुवात झाली.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून सुरु असलेल्या आंदोलनाला आता निर्णायक सुरुवात झालेली आहे. काळ्या रंगाची वेशभूषा आणि दंडावर काळ्या फिती लावून हे आंदोलन करण्यात येतं आहे.मराठा समाजातील एक प्रकारची ही क्रांतीच आहे अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण आज कोल्हापुरात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून मराठा समन्वय समितीचे कार्यकर्ते कोल्हापूरमध्ये आले असून ते मूक आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. शाहू छत्रपती, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह कोल्हापुरातील सर्व आमदार या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असून आपली मराठा समाजाच्या  आंदोलनाला पाठिंबा असल्याचे आणि पुढच्या काळामध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपला सहभाग राहील अशी ग्वाही त्यांनी येथे दिली आहे. 

भरपावसात आरक्षणासाठी लढा

मराठा समाजाचे हे मूक आंदोलन सुरू होण्याच्या पूर्वसंध्येपासून मंगळवारी कोल्हापुरात पावसाला सुरुवात झाली. बुधवारची सकाळ सुद्धा पावसाने झाली. मूक आंदोलन सुरू होत असताना पावसाचा जोर अधिकच वाढला भरपावसामध्ये मराठा समाजाचे समन्वयक, नेते, समाजबांधव-भगिनी या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. 

राजघराणे सहभागी

कोल्हापूरच्या राजघराण्यातील सर्वच सदस्य या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. खासदार संभाजीराजे, संयोगिताराजे, माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे, शहाजीराजे, यशराजे यांचाही या आंदोलनात सहभाग आहे.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूर