said Prasad Lad Uddhav Thackeray forgets Hindutva for power | सत्तेसाठी उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले : प्रसाद लाड
सत्तेसाठी उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले : प्रसाद लाड

मुंबई : राज्याता ठाकरे सरकार स्थापन झाल्यापसून शिवसेना-भाजपमधील यांच्यातील वाद अधिकच विकोपाला गेला आहे. तर दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर विविध मुद्यावरून टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नाही. दरम्यान भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्ववादाच्या मुद्यावरून निशाणा साधला आहे.

लाड यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी हिंदुत्व, स्वाभिमान, मराठा बाणा विसरले असून, आता ते इतिहास सुद्धा विसरलाय सांगत असल्याचा आरोप लाड यांनी केला.

पुढे बोलताना लाड म्हणाले की, स्वर्गीय प्रभोधनकार ठाकरे व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा इतिहास सांगण्याची हिच ती वेळ आहे. तर "गर्व से काहो हम हिंदू हैं", असे म्हणत त्यांनी हिंदुत्ववादाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

Web Title: said Prasad Lad Uddhav Thackeray forgets Hindutva for power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.