शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

साई निर्वाणाच्या नोंदीचे दस्तऐवज सापडेना

By admin | Updated: October 22, 2015 01:38 IST

साईबाबा आणि त्यांचे जीवन चरित्र अवघ्या जगाला सुपरिचित असले, तरी शतकापूर्वी झालेल्या त्यांच्या महानिर्वाणाच्या नोंदीचा कोणताही कागद सरकार दप्तरी आढळत

- प्रमोद आहेर,  शिर्डी साईबाबा आणि त्यांचे जीवन चरित्र अवघ्या जगाला सुपरिचित असले, तरी शतकापूर्वी झालेल्या त्यांच्या महानिर्वाणाच्या नोंदीचा कोणताही कागद सरकार दप्तरी आढळत नाही़ जीर्ण झालेले सरकारी दप्तर, त्यातील गहाळ झालेली पाने व कमालीच्या अनास्थेने हा दुर्मीळ व ऐतिहासिक ठेवा सध्यातरी अंधारातच आहे़१५ आॅक्टोबर १९१८ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास बाबा पंचत्वात विलीन झाले़ त्यानंतर हिंदू-मुस्लिमांच्या वादात तब्बल छत्तीस तासांनी सध्याच्या बुटीवाड्यात त्यांचा देह कोपरगावचे तहसीलदार व राहात्याचे फौजदार यांच्या उपस्थितीत समाधिस्त करण्यात आला़ब्रिटिश राजवटीतही प्रत्येक व्यक्तीच्या जन्म-मृत्यूची नोंद घेतली जात असे़ साईबाबा संस्थानची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या व साईभक्त असलेल्या राधाकृष्णा आई यांचा साईबाबांच्या निर्वाणापूर्वी २२ नोव्हेंबर १९१६ रोजी मृत्यू झाला़ त्यांच्या मृत्यूची नोंद राहाता तहसील कार्यालयाच्या रेकॉर्ड रूमला आहे़ मात्र, १९१८ सालच्या अत्यंत जीर्ण झालेल्या दप्तराची केवळ तीन निरूपयोगी पाने शिल्लक आहेत़ शिर्डीचे प्रांताधिकारी कुंदन सोनवणे यांनी कोपरगाव तर राहात्याचे नायब तहसीलदार राहुल कोताडे यांनी राहाता तहसीलमध्ये या नोंदी शोधण्याकरिता ‘लोकमत’ला केलेली मदत निष्फळ ठरली़ बाबांच्या देहाचा पंचनामाही उपलब्ध नाही़ ६ नोव्हेंबर १९६० रोजी संस्थान व्यवस्थापन बरखास्त करण्यात आले, तेव्हा कागदपत्रे नष्ट करण्याच्या प्रयत्नात अनेक महत्त्वाचे दस्तऐवजही नष्ट झाल्याचे बोलले जाते़ साईबाबांच्या काळात शिर्डी कोपरगाव तालुक्यात होते़१९९७ मध्ये कोपरगावच्या विभाजनानंतर ते राहाता तालुक्यात आले़ त्यानंतर बेवारस पडलेले शिर्डीचे दप्तर २०१२ मध्ये राहात्याला आणले गेले़ जातीच्या दाखल्यांकरिता वारंवार झालेल्या हाताळणीने त्याचीही अवस्था बिकट झाली़ माजी आयपीएस अधिकारी चंद्रभानु सतपती साईचरित्राचे अभ्यासक आहेत़ त्यांच्यासह कुणाकडे साईबाबांच्या संदर्भातील दस्तऐवजांच्या नकला मिळतात का? यासाठी जिल्हाधिकारी अनिल कवडे स्वत: प्रयत्न करत आहेत़ सतपती यांच्याकडील साईबाबा ग्रंथालयाच्या प्रती शिर्डीतही उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे उपकार्यकारी अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले़पुण्यतिथी उत्सव : साईबाबा संस्थानच्या ९७ व्या साई पुण्यतिथी उत्सवास मंगळवारी सुरुवात झाली. पहाटे साई प्रतिमा व साईसच्चरित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली़ मुंबई येथील द्वारकामाई मंडळाने यंदा सिक्कीम येथील साईमंदिराच्या प्रवेशद्वाराची ६२ फूट लांब व ५२ फूट उंच प्रतिकृती साकारली आहे़ रात्री सव्वानऊला पालखीची मिरवणूक काढण्यात आली़ विजयादशमीला भिक्षा झोळी, आराधना विधी, सीमोल्लंघन व रथ मिरवणूक कार्यक्रम होतील.