शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, नंतर अहंकार आला, म्हणून...', RSS नेते इंद्रेश कुमार यांचा भाजपवर निशाणा
2
अजित पवार गटासह शिंदेसेनेला ‘कॅबिनेट’? ‘एनडीए सरकार’चा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये
3
स्वबळाच्या डरकाळ्या! विधानसभेला मविआ, महायुतीचे समीकरण फिसकटणार? सर्वांकडून स्वतंत्र चाचपणी
4
AFG vs PNG : अफगाणिस्तानचा विजयरथ कायम! सुपर-८ मध्ये धडक; न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर
5
आजचे राशीभविष्य, १४ जून २०२४: आरोग्य उत्तम राहील, पण रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल!
6
"त्यानं भारताविरूद्ध जे केलं ते...", नसीम शाहच्या समर्थनार्थ पाकिस्तानी अभिनेत्री मैदानात!
7
'इंडस्ट्रीत एखाद्याच्या मागून....'; सिद्धार्थने सांगितली कलाविश्वातील खटकणारी गोष्ट
8
Kuwait Fire: आज भारतात आणणार मृतदेह, कोणत्या राज्यातील किती लोकांचा मृत्यू?
9
भाजपच्या मराठा आमदारांची आज बैठक, दिवसभर मंथन-चिंतन बैठकांचाही जोर
10
दहशतवादाचे कंबरडे मोडा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश; दहशतवादी घटनांचा घेतला आढावा
11
न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर! शाब्दिक युद्ध पेटलं; दिग्गजानं पाकिस्तानची लायकी काढली
12
भाजीपाल्याचा दुष्काळ: फरसबी, वाटाण्यासह दोडका १६० रुपये किलो, गवार, शेवग्यानेही ओलांडली शंभरी
13
'करा किंवा मरा'च्या सामन्यात इंग्लंडचा 'मोठ्ठा' विजय; अवघ्या १९ चेंडूत सामना जिंकला
14
संसदेत बारामतीचे तीन खासदार, सुनेत्रा पवारांनी भरला राज्यसभेचा अर्ज; विराेधात कुणीच नाही
15
Wriddhiman Saha ची नवीन खरेदी; १२ व्या वर्षी पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण, म्हणाला...
16
'घरातील काम ही फक्त महिलांची जबाबदारी का?' लोकप्रिय अभिनेत्री सान्या मल्होत्राचा सवाल
17
सूर्या, रोहितला १० वर्षांनी भेटणे विशेष, सौरभ नेत्रावळकरची प्रतिक्रिया
18
१,५६३ उमेदवारांचे ग्रेस गुण रद्द, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती; २३ जून रोजी ‘नीट’ची फेरचाचणी
19
येडीयुरप्पांविरोधात उद्या दाखल होणार चार्जशीट, निकटवर्तीय म्हणतात, ते तर दिल्लीला गेले
20
बांगलादेशची Super 8 च्या दिशेने कूच, नेदरलँड्सची हार अन् माजी विजेत्या श्रीलंकेचे संपले आव्हान

राज्यातील तिघांना साहित्य अकादमी पुरस्कार; ‘लाेकमत’चे संजय वाघ यांच्यासह प्रणव सखदेव, किरण गुरव मानकरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 7:06 AM

Sahitya Akademi Award : साहित्य अकादमीने किरण गुरव यांच्या ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ लघुकथासंग्रहाला अकादमीचा मुख्य पुरस्कार (१ लाख रूपये) मिळाला आहे.

नवी दिल्ली : साहित्य अकादमीचे यावर्षीचे पुरस्कार जाहीर झाले असून, मराठी साहित्यासाठीच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये यंदा लेखक किरण गुरव, कादंबरीकार प्रणव सखदेव, आणि बाल साहित्यिक संजय वाघ यांचा समावेश आहे. संजय वाघ हे ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीत उपवृत्तसंपादक असून, त्यांनी लहान मुलांसाठी आतापर्यंत विपुल लिखाण केले आहे.

साहित्य अकादमीने किरण गुरव यांच्या ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ लघुकथासंग्रहाला अकादमीचा मुख्य पुरस्कार (१ लाख रूपये) मिळाला आहे. साहित्य युवा अकादमी पुरस्कारासाठी प्रणव सखदेव यांच्या ‘काळे करडे स्ट्रोक्स’ कादंबरीची निवड करण्यात आली आहे. संजय वाघ यांना ‘जोकर बनला किंगमेकर’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. संजय वाघ यांची आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

ज्येष्ठ लेखक इंद्रजित भालेराव, नागनाथ काेत्तापल्ले आणि भास्कर चंदनशिव या परीक्षकांचा मराठी भाषेतील साहित्यासाठीच्या परीक्षकांमध्ये समावेश होता. साहित्य अकादमीचे अध्यक्ष डाॅ. चंद्रशेेखर कंबार यांच्या अध्यक्षतेेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील २२ प्रादेशिक भाषांसाठी पुरस्कारांची निवड व घाेषणा करण्यात आली. रोख ५० हजार रुपये व ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त होणे ही तशी प्रत्येक लेखकासाठी सर्वोच्च आनंदाची आणि अभिमानाची बाब असते. त्या आनंदाचा मी एक भाग झालो याचे अतीव समाधान आहे. आत्मविश्वास हरवलेल्या मुलांना प्रेरणा, उभारी मिळावी या हेतूने लिहिलेल्या 'जोकर बनला किंगमेकर' या किशोर कादंबरीवर पसंतीची मोहोर उमटल्याने माझ्या लेखनाचे चीज झाले असे मला वाटते.        - संजय वाघ, बालसाहित्यिक

तिघा साहित्यिकांचे अभिनंदन : मराठीचा प्रवाह विविध साहित्यकृतींद्वारे आणखी समृद्ध करण्याचे काम अनेक लेखक मोठ्या उमेदीने करत असतात. त्यांच्या या लेखन प्रवासाला यामुळे बळ मिळेल.     - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

टॅग्स :sahitya akademi awardसाहित्य अकादमी पुरस्कार