विधान परिषदेत रंगले 'साहेब' नाट्य! एकनाथ शिंदेंच्या भाषणात उद्धव ठाकरेंचा सन्मानपूर्वक उल्लेख; राजकीय चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 18:26 IST2026-03-24T18:07:47+5:302026-03-24T18:26:37+5:30
उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेत निरोप देताना उपमुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचा उल्लेख सन्मानपूर्वक 'उद्धव ठाकरे साहेब' असा केला. या उल्लेखामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

विधान परिषदेत रंगले 'साहेब' नाट्य! एकनाथ शिंदेंच्या भाषणात उद्धव ठाकरेंचा सन्मानपूर्वक उल्लेख; राजकीय चर्चांना उधाण
महाराष्ट्र विधान परिषदेत आज नऊ सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही कार्यकाळ संपणार आहे. आज या सदस्यांना विधान परिषदेत निरोप संभारणपर भाषणे झाली, महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर आणि शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उपख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील कटुता आली आहे. पण, आजच्या शिंदेंच्या भाषणात 'मवाळता' पाहायला मिळाली. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेत निरोप देताना उपमुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचा उल्लेख सन्मानपूर्वक 'उद्धव ठाकरे साहेब' असा केला. या उल्लेखामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
अशोक खरात यांची राज्यात कुठे, किती संपत्ती? मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत सगळी यादीच वाचली
सभागृहात सदस्यांना निरोप देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब हे आज विधान परिषदेचा निरोप घेत आहेत. त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, तसेच त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठीही शुभेच्छा देतो." शिवसेना फुटीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले आहे. अनेकदा एकमेकांवर जहरी टीका करणाऱ्या या नेत्यांमध्ये आजच्या निरोप समारंभात मात्र कमालीचा संयम आणि आदर पाहायला मिळाला. एकनाथ शिंदेंनी 'साहेब' हा शब्द उच्चारला.
एकनाथ शिंदेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क लावले जात आहेत. हा केवळ निरोप समारंभातील शिष्टाचार होता की भविष्यातील बदलत्या राजकीय समीकरणांची ही नांदी आहे, याबाबत आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.