शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 07:29 IST

तज्ज्ञ समितीच्या सुरक्षा शिफारसी लागू करण्याचेही राज्य सरकारला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उंच इमारती आणि मोठ्या सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांवरील सुरक्षा आवश्यकता या सार्वजनिक हितासाठी अत्यावश्यक असल्याचे नमूद करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला राज्यभरातील अशा बांधकामांच्या ठिकाणी तज्ज्ञ समितीच्या सुरक्षा शिफारसी लागू करण्याचे निर्देश दिले.

हा आदेश मार्च २०२३ मधील उंच इमारतींच्या बांधकामांच्या ठिकाणी सुरक्षा त्रुटींशी संबंधित प्रकरणातील कार्यवाही न्यायालयाने पुन्हा सुरू केल्यावर देण्यात आला. ही कार्यवाही ५ ऑगस्ट रोजी भिवंडीतील मेट्रो-५ च्या प्रकल्प स्थळावर झालेल्या अपघातानंतर पुन्हा सुरू करण्यात आली. बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपुलावरून लोखंडी रॉड तेथून जाणाऱ्या रिक्षेवर पडला. यात रिक्षेतील प्रवासी जखमी झाला, तसेच २०२३ मध्येही वरळी येथील एका ५२ मजली इमारतीचे बांधकाम सुरू असताना सिमेंट ब्लॉक पडून दोन पादचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने म्हटले की, २०२३ च्या दुर्घटनेनंतर तज्ज्ञ सुरक्षा समिती स्थापन केली असली तरी त्यांच्या शिफारसी सर्व नियोजन प्राधिकरणांना दिल्या नाहीत. न्यायालयाने म्हटले की, मुंबई शहरात असे कोणतेही उंच बांधकाम नसावे की ज्यामुळे लोक अशा अपघातांना बळी पडतील. सार्वजनिक ठिकाणी लोकांना अशा धोक्यांना सामोरे जावे लागणे हे राज्यघटनेचे कलम २१ अंतर्गत उपजीविकेच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करणारे आहे.

'दहा दिवसांच्या आत निर्देश द्या'

हा अहवाल अत्यंत सार्वजनिक हिताचा असल्याचे नमूद करत, न्यायालयाने मुंबई महापालिकेला इमारत परवानग्यांमध्ये त्या उपायांचा समावेश करण्याचे निर्देश दिले, तसेच मुंबई महानगर प्रदेशातील सर्व नियोजन प्राधिकरणांनी आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये जिथे अशी कामे सुरू आहेत, तिथेही याची अंमलबजावणी करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने यूडीडीच्या प्रधान सचिवांनी दहा दिवसांच्या आत हे निर्देश जारी करावेत. जेणेकरून महापालिका, नियोजन प्राधिकरणे जे उंच उंचीच्या इमारतींचे प्रकल्प राबवीत आहेत, त्यांना या शिफारसींची अंमलबजावणी करावी.

इमारतींसाठी तयार केलेल्या नियमांचे वारंवार उल्लंघन

१. समितीने सादर केलेल्या 'बांधकाम ठिकाणी उंचीवर काम करण्यासाठी विशेष सुरक्षा नियंत्रण शिफारशी' यामध्ये मुंबईतील उंच इमारतींची तपशिलात माहिती दिली आहे.२. मुंबईत १५० मीटरपेक्षा उंच १८१ इमारती आहेत. २०० मीटरपेक्षा उंच ४७ इमारती आणि २५० पेक्षा अधिक उंच २४ इमारती असल्याचे नमूद केले आहे. सर्वांत उंच लोखंडवाला मिनर्व्ह ३०१.०६ मीटर उंच आहे, तर १५० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या ४१६ इमारती बांधकामाअधीन आहेत.३. शहरात उंच इमारती बांधण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान अवलंबिले जात आहे. मात्र असे असले तरी तज्ज्ञांच्या समितीच्या अहवालात उंच इमारतींसाठी तयार केलेल्या नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार