शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

सदाभाऊ खोत यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला; सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपलंय, तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 15:57 IST

या सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. शेतकऱ्यांचा पुळका घेऊन बोलणारे नेते आज शेतकऱ्यांसाठी काय करताय? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देदूध उत्पादकांचा आवाज सरकारपर्यंत पोहचला नाही का?राज्यातील केवळ १० तालुक्यातून दूधाचं संकलन केले जाते१ ऑगस्टच्यापूर्वी दूध उत्पादकांच्या प्रश्नांवर सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा राज्यभर आंदोलनशेतीला जोडधंदा म्हणून दूधाचा धंदा केला जातो, पण त्याकडेही सरकारचं दुर्लक्ष

मुंबई - राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक भाषण केली, कोरोनाशी लढा पण शेतात लढणाऱ्या शेतकऱ्यांची मदत का करत नाही? हे सरकार कोरोनाचा बागुलबुवा दाखवत आहे, कोणताही प्रश्न आला तरी कोरोनाचं नाव पुढे केले जाते, सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपलय, तर सामान्य माणूस आत्महत्येच्या दरडीवर उभा आहे अशा शब्दात माजी कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकारवर घणाघात केला आहे.

पत्रकारांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, राज्यात सहकाराच्या माध्यमातून २४ टक्के दूध संकलन केले जाते तर खासगीच्या माध्यमातून ७६ टक्के दूध संकलन होते, या सहा महिन्यात शेतकऱ्यांचा भाजीपाला सडला, आंब्याला फटका बसला, फळांची नासाडी झाली पण सरकारकडून कोणतीही बाजारपेठ उभी राहिली नाही, राज्यात २० टक्क्यापेक्षा जास्त पिककर्ज शेतकऱ्यांना मिळू शकलं नाही. शेतीला जोडधंदा म्हणून दूधाचा धंदा केला जातो, पण त्याकडेही सरकार दुर्लक्ष करत आहे. दूधाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांना समजत नाही किंवा समजूनही ते मुक्या-बहिऱ्यासारखं करत आहेत असा टोला खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला.

तसेच दूधाच्या प्रश्नावर राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. दूध भुकटी परदेशातून आयात केल्यानं उत्पादकांना फटका बसला असा आरोप महाविकास आघाडीचे नेते करतात, पण केंद्राने एक किलो भुकटी परदेशातून आयात केली नाही, दुध भुकटी परदेशातून आणण्यास केंद्राने परवानगी दिली नाही. दूध उत्पादकांचा आवाज सरकारपर्यंत पोहचला नाही का? या सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. शेतकऱ्यांचा पुळका घेऊन बोलणारे नेते आज शेतकऱ्यांसाठी काय करताय? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, राज्यातील केवळ १० तालुक्यातून दूधाचं संकलन केले जाते, उर्वरित तालुक्यातून दूध संकलन केले जात नाही, यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, सुनील केदार यांच्या संघातून दूध खरेदी केली जाते असा आरोप खोत यांनी केला, त्याचसोबत १ ऑगस्टच्यापूर्वी दूध उत्पादकांच्या प्रश्नांवर सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा गावांगावातील दूध डेअरीसमोर हातात बॅनर घेऊन मागण्यांचे बॅनर्स झळकावू, रस्त्यावर दुधाची वाहने आली तर ती परतवून लावू असा इशारा महायुतीच्या माध्यमातून त्यांनी दिला आहे. सोबतच दुधाची नासाडी करु नये, आंदोलनातील दूध रस्त्यावर न फेकता गरिबांना वाटा अशा कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmilkदूधSadabhau Khotसदाभाउ खोत FarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार