शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
3
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
4
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
5
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
6
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
7
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
8
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
9
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
10
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
11
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
12
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
13
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
14
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
15
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
16
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
17
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
18
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
19
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
20
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली

“ठाकरे व पवार पाठीत खंजीर खुपसणारे राजकारणी, हे चंद्रकांत पाटलांचे वास्तववादी भाष्य”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 16:01 IST

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाशी सहमत असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले.

नांदेड: गेल्या अनेक कालावधीपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात विविध विषयांवरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. कोरोना निर्बंधांपासून ते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पाठीत खंजीर खुपसणारा एकच चेहरा होता, आता दोन चेहरे झालेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यावर, चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेशरद पवार यांच्यावर केलेले भाष्य हे वास्तववादी असून, आपण समहमत असल्याचे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. (sadabhau khot gave support to statement of chandrakant patil on uddhav thackeray and sharad pawar)

“केवळ महिला घरात असताना CBI ने कारवाई करणे चुकीचे”; सुप्रिया सुळेंची टीका

भाजपची स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी तयारी सुरू आहे. युतीत निवडणूक लढणार नाही. फक्त जे प्रामाणिकपणे आपल्यासोबत आहे, ज्यांच्यासोबत निवडणूक लढवणार. पण नाव मोठे लक्षण खोटे आपल्याला नको. पाठीत खंजीर खोपसणारे आपल्याला नको अशी टीका करत  पाठीत खंजीर खुपसणारे एकच नाव आधी होते, पण आता दुसरा चेहरा दिसतोय, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी थेट शिवसेनेवर घणाघात केला. याला सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दर्शवला आहे. 

“यात काडीमात्र तथ्य नाही, हा फक्त शिळ्या कढीला उत आणायचा प्रयत्न”; भुजबळांचे प्रत्युत्तर

अनेकांना सत्तेसाठी चकवा दिला

शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल कुठेही विकता आला पाहिजे. परंतु ज्यावेळी कृषी विषयक सभागृहात आले, त्यावेळी मात्र त्यास मूक संमती दिली. त्यांनी सत्तेसाठी काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी केली. अनेकांना सत्तेसाठी चकवा दिला. त्यांची जी कुटणीती आहे ही महाराष्ट्राला परिचित आहे. म्हणून देशपातळीवरील राजकारणात शरद पवारांना अथवा त्यांच्या एखाद्या घोषणेला फारसे महत्व दिले जात नाही, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला. 

केंद्रातील मोदी सरकार म्हणजे सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’; काँग्रेसचा घणाघात

शरद पवारांची चाल महाराष्ट्राला माहितीय

शरद पवार हे चकवा देणारे राजकारणी आहेत, हे देशपातळीवरील राजकारण्यांना माहिती झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे व शरद पवारांची चाल महाराष्ट्राला माहित झाली आहे. म्हणून चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानाशी सहमत असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. 

“आता जितेंद्र आव्हाड यांचा नंबर; लिस्टमधील १२वा खेळाडू!”; किरीट सोमय्यांचा दावा

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी मार्ग खुले असल्याचे सांगत आमच्या पाठीत खंजीरच खुपसला होता. विधानसभा निकालावेळी ४ वाजता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होती. त्यावेळी मी पुण्यातून येत होतो. पण, उद्धव ठाकरेंनी ४ वाजताची पत्रकार परिषद तुमची तुम्ही करा आणि माझी मी करतो असे म्हटले. तिथेच गडबड झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी सर्व मार्ग मोकळे आहेत असे म्हटले. त्यांना वेगळाच मार्ग निवडायचा होता, तर आधी युती का केली? सेनेने विश्वासघात केला, विश्वासघाताचेच नाव पाठित खंजीर खुपसणे आहे, असे पाटील म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणSadabhau Khotसदाभाउ खोत chandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना