शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 19:06 IST

Sadabhau Khot News: मराठी भाषेची ही लढाई तुमची असती, तर पंढरपूरच्या वारीला तुम्ही आला असता. लाखो लोक मराठीचा जयघोष करत निघाले आहेत. ते लोक मराठी वाढवत आहेत, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

Sadabhau Khot News: महाराष्ट्रातील मराठी माणसाची मराठी भाषा धोक्यात आलेली नाही. ही लढाई खुर्चीची आहे. मराठी भाषेची नाही. मराठी भाषेची ही लढाई तुमची असती, तर पंढरपूरच्या वारीला तुम्ही आला असता. लाखो लोक मराठीचा जयघोष करत निघाले आहेत. ते लोक मराठी वाढवत आहेत. तुम्ही काय वाढवत आहात. तुम्ही फक्त ही भाषा बोलू नका, ती भाषा बोलू नका, असे सांगत आहात, अशी टीका शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी केली.

इयत्ता पहिलीपासून सक्तीने हिंदी शिकवण्याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आंदोलनाच्या मैदानात उतरले आहेत. ५ जुलैला मनसेचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला उद्धव ठाकरे गटानेही पाठिंबा दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही या मोर्चाचे समर्थन केले आहे. दोन्ही गट या मोर्चात सहभागी होणार आहेत. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र येत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. महायुतीत हिंदीच्या मुद्द्यावरून मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच सदाभाऊ खोत यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. 

मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात

मी माझ्या मुलांना इंग्रजी का शिकवू नये, असा सवाल करतानाच, आयएस अधिकारी होताना इंग्रजी लागते ना, युपीएससीच्या परीक्षेला इंग्रजी लागते ना, परराष्ट्र सचिव होताना इंग्रजी लागते ना, मग ते का माझ्या लेकरांनी का शिकायचे नाही, जे आज आंदोलन करत आहेत त्यांना माझा साधा प्रश्न तुमच्या लेकरांना इंग्रजी येते का? विमानात बसल्यावर तुमची मुले इंग्रजीत बोलतात ना? तुमची लेकरे कोणत्या मराठी भाषेत शिकली त्यांची नावे आम्हाला सांगा? अशी विचारणा सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तसेच मराठी भाषा गावगाड्यातील माणसांनी जपली आहे. मराठी भाषा धोक्यात आली नाही तर यांच्या खुर्च्या धोक्यात आल्या आहेत, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. 

दरम्यान, आमची मराठी भाषा चिरकाल टिकणार आहे. मराठी भाषेवर आक्रमण हा ढोंगीपणा आहे. माझ्या लेकराला हिंदी इंग्रजी आले पाहिजे, कारण मला जगाबरोबर चालायचे असेल तर ती भाषा आली पाहिजे. त्यांची लेकरे इंग्रजी बोलायला लागली आहेत. तुमची लेकरे चांगल्या शाळेत शिकणार इंग्रजी बोलणार. जगात जाणार, वेगवेगळे देश फिरणार आणि इथे येऊन तुम्ही सांगणार दुसरी भाषा शिकता कामा नये, या शब्दांत सदाभाऊ खोत यांनी निशाणा साधला.

 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेmarathiमराठीhindiहिंदी